Breaking News

“तो सगळ्यांची तोंडे बंद करेल”, ‘त्या’ सहकाऱ्याकडून Virat Kohli ची पाठराखण, सुपर 8 आधी…

Virat Kohli
Photo Courtesy: X

Virat Kohli Form In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली आहे. भारताने आपले तीन साखळी सामने जिंकत सुपर 8 (Super 8) मध्ये सहज प्रवेश केला. मात्र, संघाच्या या यशात अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याचे योगदान फलंदाजीत अपेक्षेप्रमाणे आले नाही. त्याच्यावर काहीजण टीका करत असतानाच आता अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) याने त्याची पाठराखण केली आहे.

भारताने एक सामना शिल्लक असतानाच विश्वचषकाच्या पुढील फेरीत प्रवेश केला. पहिल्या सामन्यात आयर्लंड, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान व तिसऱ्या सामन्यात यूएसए संघाला भारताने पराभूत केले. मात्र, विराट कोहली या तीनही सामन्यात अपयशी ठरला. त्याने पहिल्या सामन्यात 1, दुसऱ्या सामन्यात 4 व तिसऱ्या सामन्यात शून्य धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे अनेक जण त्याच्यावर टीका करताना दिसले (Virat Kohli Flop In T20 World Cup 2024).

यूएसएविरुद्ध विजय संपादन केल्यानंतर भारतीय संघाकडून शिवम दुबे हा पत्रकार परिषदेत आला होता. विराटच्या फॉर्मविषयी प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला,

“विराटबद्दल बोलणारा मी कोण? हे खरे आहे की त्याने तीन सामन्यात धावा बनवल्या नाहीत. मात्र, असेही घडू शकते की तो पुढच्या तीन सामन्यात तीन शतके करेल.‌ त्यानंतर सर्वांची तोंडे बंद होतील व अशी चर्चा होणार नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे की तो कोणत्या दर्जाचा खेळाडू आहे.”

भारतीय संघ आपला अखेरचा साखळी सामना कॅनडाविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर भारत सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया व बांगलादेश/नेदरलँड्स यांच्यापैकी एका सोबत खेळेल.

(Shivam Dube Backs Virat Kohli On His Bad Form)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *