
आयपीएल 2024 (IPL 2024) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला. या विजयासह केकेआर संघ आयपीएल 2024 अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला. संघाच्या या यशात कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचे अतुल्य योगदान राहिले. सध्या भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या (बीसीसीआय) करारात नसलेला खेळाडू ते यंदाच्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला कर्णधार अशी सफर त्याने करून दाखवली.
– Qualified into the final.
– 9 wins in league stage.
– KKR top of the Points table for the first time.
– Highest NRR ever in IPL history.
– 58*(24) in Qualifier 1.TAKE A BOW, CAPTAIN SHREYAS IYER. 💪 pic.twitter.com/v1HLIZQEVw
— Johns. (@CricCrazyJohns) May 21, 2024
मागील वर्षी झालेल्या वनडे विश्वचषकात खोऱ्याने धावा काढल्यानंतरही फेब्रुवारी महिन्यात बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक करारात त्याला स्थान मिळाले नव्हते. त्यावरून मोठा वाद झाला होता. मात्र, त्यानंतर आयपीएलमध्ये त्याने पुनरागमन केले. गेल्या हंगामाला दुखापतीमुळे मुकलेल्या श्रेयसने यावेळी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
नवीन मेंटर गौतम गंभीर याच्या सोबतीने त्याने असे काही निर्णय घेतले ज्यामुळे केकेआर संघ विजयीरथावर आरूढ झाला. सुनील नरीन याला सलामीला पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय त्याने घेतला. सोबत युवा भारतीय खेळाडू दाखवलेला विश्वास संघाच्या यशासाठी कारणीभूत ठरला.
नेतृत्वासोबतच स्वतः फलंदाजीत त्याने छाप पाडली. संघाला गरज असताना त्याने छोट्या मात्र प्रभावशाली खेळ्या केल्या. त्याने आतापर्यंत हंगामात तेरा सामने खेळताना 345 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी 38 तर स्ट्राईक रेट 146 पेक्षा जास्त राहिला. क्वालिफायर सामन्यातही केवळ 24 चेंडूत 58 धावांची नाबाद वादळी खेळी त्याने केली. आता दहा वर्षानंतर केकेआरला तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून देण्याचे शिवधनुष्य त्याला पेलावे लागणार आहे.
(Shreyas Iyer Show Solid Intent After Not Contracted By BCCI Now He Lead KKR In IPL 2024 Final)
lasix contraindications LEVO T Dosing Guidelines for Pediatric Hypothyroidism AGE Daily Dose Per Kg Body Weight a 0 3 months 10 15 mcg kg day 3 6 months 8 10 mcg kg day 6 12 months 6 8 mcg kg day 1 5 years 5 6 mcg kg day 6 12 years 4 5 mcg kg day Greater than 12 years but growth and puberty incomplete 2 3 mcg kg day Growth and puberty complete 1