Breaking News

कॅच ऑफ द इयर! Siddharth Mhatre ने MPL 2025 मध्ये टिपलेला हा झेल मिस करू नका

Siddharth mhatre
Photo Courtesy: X

Siddharth Mhatre Catch In MPL 2025: महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 (MPL 2025) च्या 17 व्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्सवर रोमांचक विजय मिळवला. मात्र, या सामन्यात कोल्हापूरचा खेळाडू सिद्धार्थ म्हात्रे याने टिपलेल्या एका झेलाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

Siddharth Mhatre Catch In MPL 2025

विजयासाठी 187 धावांचा पाठलाग करत असताना पुणेरी बाप्पा संघाने जबरदस्त फलंदाजी केली. अखेरच्या षटकात त्यांना विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. पहिल्या दोन चेंडूवर तीन धावा निघाल्यानंतर पुणे संघाला शेवटच्या चार चेंडूंमध्ये सहा धावा हव्या होत्या. आधीच्या चेंडूवर अर्धशतक केलेल्या रामकृष्ण घोष (Ramkrishna Ghosh) याने सरळ षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, लॉंग ऑनवरून चित्त्यासारखी झेप घेत सिद्धार्थ म्हात्रे याने झेल पूर्ण केला. त्याच्या या झेलाने अल्पावधीत प्रसिद्धी मिळवली असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ वारंवार पाहिला जातोय.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा- Story Of Temba Bavuma: 27 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेला चोकर्स ते चॅम्पियन बनवणारा टेंबा बवुमा