Breaking News

SL vs IND: विजयी सुरुवातीसाठी टीम इंडिया सज्ज, वाचा पहिल्या टी20 बाबत सर्वकाही

SL VS IND
Photo Courtesy: X

SL vs IND T20I: श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघ शनिवारी (27 जुलै) टी20 मालिकेसह दौऱ्याला सुरुवात करेल. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना पल्लेकले येथे खेळला जाणार आहे. या सामन्यातून भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) व कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) नवी सुरुवात करतील.

रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा हे तीन अनुभवी खेळाडू टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय ‌टी20 मधून निवृत्त झाले आहेत. यासोबतच अनुभवी फिरकी जोडी कुलदीप यादव व युजवेंद्र चहल हे देखील संघाचा भाग नाहीत. तर, जसप्रीत बुमराह हा या मालिकेसाठी उपलब्ध नसेल. त्यामुळे सर्व अर्थाने नवा भारतीय संघ यावेळी मैदानात उतरेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

या सामन्यात भारतीय संघासाठी शुबमन गिल व यशस्वी जयस्वाल ही जोडी सलामी देताना दिसू शकते. मधला फळीत कर्णधार सूर्यकुमार यादव, रिषभ पंत व संजू सॅमसन दिसण्याची शक्यता आहे. तर, फिनिशर म्हणून हार्दिक पांड्या व रिंकू सिंग जबाबदारी सांभाळते. फिरकीची बाजू अक्षर व बिश्नोई यांच्याकडे असेल. मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त असल्याने खलील अहमद व अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाज म्हणून संघात जागा बनवतील.

पल्लेकले येथे होणाऱ्या या सामन्यात पावसाचा व्यक्ती येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे संपूर्ण सामना झाल्यास मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता सामना सुरू होईल. भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन-

भारत- शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत, रिंकू सिंग, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग व खलील अहमद.

श्रीलंका- पथुम निसंका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, दसून शनाका, वनिंदू हसरंगा, महिश तिक्षणा, दिलशान मधुशंका, मथीशा पथिराना व रमेश मेंडिस.

(SL vs IND Team India Hoping New Start Under Gambhir And Surya)