Breaking News

कोण आहे टी20 वर्ल्डकपमध्ये चर्चेत आलेला Frank Nsubuga? युंगाडा क्रिकेटसाठी वेचले आयुष्य, वाचा ही कहाणी

frank nsubuga
Photo Courtesy: X/Uganda Cricket

Story Of Frank Nsubuga|टी20 विश्वचषक 2024 मध्ये गुरूवारी (6 जून) युगांडा विरुद्ध पापुआ न्यू गिनी (UGDvPNG) असा सामना खेळला गेला. कमी धावसंख्येच्या मात्र अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात युगांडा संघाने तीन गडी राखून विजय मिळवला. पात्रता फेरीतून इथपर्यंत मजल मारलेल्या युगांडा संघाला आपला पहिला विश्वचषक विजय मिळवण्यासाठी फक्त दोन सामने लागले. परंतु, अत्यंत मेहनतीने इथपर्यंत पोहोचलेल्या या संघाच्या विजयात संघाच्या सर्वात अनुभवी खेळाडूनेच हातभार लावला. त्याचे नाव फ्रॅंक त्सुबुगा (Frank Nsubuga).

गयाना येथे झालेल्या या सामन्यात युगांडा संघाने गिनीला केवळ 77 धावांवर रोखले होते. या धावांचा पाठलाग करताना त्यांना देखील 19 व्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला. मात्र, अखेर त्यांनी विजय आपल्या नावे केला. गोलंदाजी करताना संघासाठी सर्वोत्तम योगदान फ्रॅंक त्सुबुगा याने दिले. त्याने सामन्यात चार षटके टाकताना केवळ चार धावा देत दोन बळी मिळवले. यामध्ये दोन निर्धाव षटके होती (Frank Nsubuga). हा टी20 विश्वचषक इतिहासातील सर्वात कंजूस स्पेल ठरला.‌ त्याने हा विक्रम केला असला तरी त्याची कहानी देखील तितकीच रंजक आहे.

अवघ्या तीन पावलांचा रन अप, छोटीशी उडी आणि हळुवार ऑफ स्पिन टाकणारा फ्रॅंक सध्या आहे 43 वर्षांचा. या विश्वचषकात खेळत असलेला सर्वात वयस्कर खेळाडू. तो युगांडा राष्ट्रीय संघासाठी तब्बल 27 वर्षांपासून खेळतोय. त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी 1997 मध्ये पहिल्यांदा युगांडा राष्ट्रीय संघासाठी पदार्पण केले होते. अनेक वेळा त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी देखील मिळाली. अगदी क्रिकेटच्या पायाभूत सुविधा ही देशात नसताना, आज युगांडा संघ टी20 विश्वचषकात खेळतोय याचे बरेचसे श्रेय त्याला दिले जाते.

(Story Of Uganda Cricketer Frank Nsubuga Who Bowl Best Spell Of T20 World Cup History)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *