
Syed Modi International 2025 Semi Final Line Ups: भारतातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा असलेल्या सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेच्या पुरुष व महिला एकेरीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने शुक्रवारी (28 नोव्हेंबर) खेळले गेले. भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत चार जणांनी उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली.
🚨 TANVI SHARMA STORMS INTO SEMIS 💥
She defeated Sin Yan Happy 🇭🇰 in straight sets 21-13, 21-19 in QF of Syed Modi International 2025!
WELL DONE, TANVI 🇮🇳💙 pic.twitter.com/o4Iym7RfRd
— The Khel India (@TheKhelIndia) November 28, 2025
Syed Modi International 2025 Semi Final Line Ups
भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत (K. Srikant) याला पी. राजावत याने दुखापतीमुळे सामना अर्ध्यातून सोडल्याने उपांत्य सामन्यात जागा मिळाली. तर, मंजुनाथ याने मनराज सिंग याला 21-18,21-13 असे सरळ गेममध्ये हरवत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. जपानचा मिनोरो कोगा व हॉंगकॉंगच्या जीया जेसन यांनी आपापले सामने जिंकून उपांत्य सामन्यात खेळण्याचा मान मिळवला. श्रीकांत विरुद्ध मंजुनाथ असा उपांत्य फेरीचा पहिला सामना होणार असल्याने, एक भारतीय अंतिम सामन्यात खेळणे निश्चित आहे.
दुसरीकडे महिला गटात युवा तन्वी शर्मा (Tanvi Sharma) ही आपल्या दुसऱ्याच स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरली. ती उपांत्य सामन्यात जपानच्या अकेचीविरूद्ध खेळेल. तर, दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताचीच उन्नती हुडा टर्कीच्या नेसहीन करीन विरुद्ध संघर्ष करेल.
Latest Sports News In Marathi
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ही दोस्ती तुटायची नाय! Virat Kohli-MS Dhoni चे रियुनियन, पाहा व्हिडिओ
kridacafe