
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने गतविजेत्या इंग्लंडला प्रतिकाराची संधी न देता 36 धावांनी मोठा विजय मिळवला. या पराभवामुळे इंग्लंडसमोर आता विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की येऊ शकते.
बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. आतापर्यंत विश्वचषकात सर्व संघ आक्रमक फलंदाजी करण्याची हिम्मत करताना दिसले नव्हते. मात्र, ट्रेविस हेड (34) व डेव्हिड वॉर्नर (39) यांनी ही हिंमत दाखवत पहिल्या सहा षटकातच 70 धावा ठोकल्या. त्यानंतर इंग्लंडने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिचेल मार्श (35), ग्लेन मॅक्सवेल (28) व मार्कस स्टॉयनिस (30) यांनी उपयुक्त योगदान देत संघाला 200 ची मजल मारून दिली. इंग्लंडसाठी जॉर्डन याने दोन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या 202 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला कर्णधार जोस बटलर व फिल सॉल्ट यांनी वेगवान सुरुवात दिली. दोघांनी सात षटकात 71 धावा केल्या. मात्र, फिरकीपटू ऍडम झंपा गोलंदाजीला आल्यावर इंग्लंडच्या धावगतीला ब्रेक लागला. इतर फलंदाज मोठी धावसंख्या देखील करू शकले नाहीत व धावांचा वेग ही वाढवू शकले नाहीत. त्यामुळे निर्धारित 20 षटकात त्यांना केवळ 165 धावा करता आल्या.
या पराभवामुळे इंग्लंडवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की येऊ शकते. त्यांना आता ओमान व नामिबियाविरूद्ध विजय मिळवणे आवश्यक असेल. तसेच, स्कॉटलंड पराभूत व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांना करावी लागेल.
(T20 World Cup 2024 Australia Beat England By 36 Runs)
Hello my loved one! I wish to say that this post is awesome, nice written and come with approximately all significant infos. I?¦d like to peer more posts like this .