
Teams Qualified For FIFA World Cup 2026: जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ असलेल्या फुटबॉलचा आगामी विश्वचषक 2026 मध्ये खेळला जाईल. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक म्हणून या आयोजनाकडे पाहिले जात आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कॅनडा व मेक्सिको येथे होणाऱ्या या विश्वचषकात 48 संघ सहभागी होतील. आतापर्यंत 33 संघांनी स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
Teams Qualified For FIFA World Cup 2026
ऑलिम्पिकनंतर दुसरी सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून फिफा फुटबॉल विश्वचषकाकडे पाहिले जाते. आजपर्यंत या स्पर्धेत 32 संघ सहभागी होत होते. यावेळी हा आकडा 48 पर्यंत पोहोचला आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत दीदीला खंडातील 34 संघांनी पात्रता मिळवली. सर्वकालिन महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याचा पोर्तुगाल फुटबॉल संघ (Portugal Football Team) हा देखील विश्वचषकासाठी पात्र ठरला असून, रोनाल्डो आपला अखेरचा विश्वचषक खेळेल. तर, लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याचा अर्जेंटिना विश्वचषक राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
असून, त्यांची यादी खालीलप्रमाणे,
यजमान– अमेरिका, कॅनडा व मेक्सिको
युरोप– क्रोएशिया, फ्रान्स, इंग्लंड, नॉर्वे, नेदरलँड, पोर्तुगाल व जर्मनी
दक्षिण अमेरिका– अर्जेंटिना, ब्राझील, कोलंबिया, इक्वाडोर, पॅराग्वे व ऊरूग्वे
आफ्रिका– केप वार्डे, दक्षिण आफ्रिका, अल्जेरिया, इजिप्त, घाना, आयवरी कोस्ट, मोरोक्को व सेनेगल
एशिया– ऑस्ट्रेलिया, ईरान, जपान, जॉर्डन, कतार, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया व उझबेकिस्तान
ओशेनिया– न्यूझीलंड
उत्तर अमेरिका– अद्याप एकही नाही
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Indian Football Team ने गाठला तळ! बांगलादेशनेही चारली धूळ
kridacafe