Breaking News

Virat Kohli 30th Test Century: दुष्काळ संपला! कसोटीत विराटच्या शतकांची तिशी, पर्थ जिंकण्यासाठी यजमानांसमोर 534 धावांचे अशक्यप्राय आव्हान

virat kohli 3oth test century
Photo Courtesy: X

Virat Kohli 30th Test Century: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUSvIND) यांच्या दरम्यान पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीवर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्या अप्रतिम दीड शतकांनंतर विराट कोहली याने देखील आपले 30 वे कसोटी शतक पूर्ण केले. तसेच ऑस्ट्रेलियात कसोटी शतके झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला. त्यानंतर भारतीय संघाने आपला पहिला डाव घोषित करत, ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचे आव्हान ठेवले.

पहिल्या डावात केवळ 150 धावांमध्ये सर्वबाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचा डाव 104 धावांवर संपवत 46 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. मात्र, भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल व केएल राहुल यांनी तब्बल 221 धावांची भागीदारी करत भारताला सामन्यात बरेच पुढे नेले. राहुलने 77 धावांचे योगदान दिले. त्यानंतर जयस्वाल याने आपल्या ऑस्ट्रेलियातील पहिल्याच कसोटीत 161 धावांची अफलातून व ऐतिहासिक खेळी केली. या दोघांनी रचलेल्या पायावर विराट कोहली याने कळस चढवला.

विराटने फलंदाजीला अनुकूल झालेल्या खेळपट्टीवर आक्रमक धोरण स्वीकारले. त्याने वर्षभरापासून सुरू असलेला आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळ संपवत नाबार्ड 100 धावांची खेळी केली. विराटने शतक पूर्ण करतात भारताने आपला डाव घोषित करत ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे मोठे आव्हान उभे केले.

विराटचे हे कसोटी क्रिकेटमधील 30 वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 81 वे शतक ठरले. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजात त्याने पहिले स्थानही मिळवले. त्याचे ऑस्ट्रेलियातील हे आठवे शतक ठरले. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर असून, त्याने ऑस्ट्रेलियात सात शतके ठोकली होती. तर सुनील गावसकर यांनी पाच व व्हीव्हीएस लक्ष्मण याने पाच शतके झळकावलेली.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था खराब झाली असून, त्यांनी केवळ बारा धावांमध्ये आपले तीन फलंदाज गमावले आहेत. भारत सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.

(Virat Kohli 30th Test Century At Perth)