Breaking News

धोनीच्या रांचीत Virat Kohli चे शतक नंबर 52

virat kohli
Photo Courtesy: X

Virat Kohli Hits 52 nd ODI Century In Ranchi ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यान रांची येथे पहिला वनडे सामना खेळला गेला. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने या सामन्यात आपल्या शानदार फलंदाजीचे दर्शन घडवले. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत त्याने शतक पूर्ण केले. हे त्याचे 52 वे वनडे शतक ठरले.

Virat Kohli Hits 52 nd ODI Century In Ranchi ODI

रांची येथे झालेल्या या सामन्यात यशस्वी जयस्वाल याच्या रूपाने भारताला पहिला धक्का लवकर बसला. मात्र, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराटने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. त्याने 4 षटकारांच्या मदतीने 48 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर हे त्याने न थांबता 101 चेंडूवर शतकाला गवसणी घातली. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 52 वे शतक होते. वनडे विश्वचषक 2023 उपांत्य सामन्यानंतर त्याच्या बॅटमधून वनडे शतक आले.

बाद होण्यापूर्वी विराटने 120 चेंडूत 135 धावा केल्या. यामध्ये 11 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Rohit Sharma ला मिळाले वनडे हिटमॅनचे अधिकृत सर्टिफिकेट! रांची वनडेत हे घडल