
WTC Final 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजे डब्ल्यूटीसी 2023-2025 (WTC 2023-2025) चा अंतिम सामना बुधवारी (11 जून) सुरू होईल. चॅम्पियनशिप सायकलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी राहिलेल्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्या दरम्यान हा सामना खेळला जाईल. सामन्याच्या एक दिवस आधीच दोन्ही संघांनी आपली प्लेईंग इलेव्हन घोषित केली आहे.
It's almost time ⏳
South Africa and Australia face off in the Ultimate Test from tomorrow 🤩
All you need to know ➡️ https://t.co/SSsSiOKUj2 pic.twitter.com/5s04WKF76i
— ICC (@ICC) June 10, 2025
WTC Final 2025 AUSvSA Playing XI
क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे. उभय संघांनी 2023 ते 2025 या सायकलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आपले अभियान संपवले. आता 11 ते 15 जून दरम्यान होणाऱ्या या अंतिम सामन्यात ते मानाच्या गदेसाठी लढतील. पहिली डब्ल्यूटीसी सायकल न्यूझीलंडने तर, दुसरी ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केली होती.
ऑस्ट्रेलियाने या अंतिम सामन्यासाठी आपल्या संघात तीन प्रमुख वेगवान गोलंदाजांसह एका अष्टपैलू वेगवान गोलंदाजाला संधी दिली आहे. तर, कॅमेरून ग्रीन मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका संघात टोनी डी जोर्जी व कॉर्बिन बॉश जागा बनवण्यात अपयशी ठरले. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन- उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, एलेक्स केरी, ब्यु वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड व नॅथन लायन.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन- टेंबा बवुमा (कर्णधार), रियान रिकलटन, ऐडन मार्करम, वियान मलडर, ट्रिस्टन स्टब्स, डेविड बेडिंगम, कायल वेराने, मार्को यान्सन, कगिसो रबाडा, केशव महाराज व लुंगी एन्गिडी.
WTC Final 2025 AUSvSA Playing XI
चालू दौऱ्यात भारतीय संघातून बाजूला झाला Ruturaj Gaikwad, अचानक घेतला नवा निर्णय
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।