Toni Kroos Retirement| जर्मनी आणि रियाल माद्रिदचा महान फुटबॉलपटू टोनी क्रूस (Toni Kroos) याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आगामी युरो कप 2024 ((Euro Cup 2024) स्पर्धेनंतर तो सर्व प्रकारच्या फुटबॉलमधून निवृत्त होईल. जर्मनीने जिंकलेल्या 2014 फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता.
https://www.instagram.com/p/C7OkVUKoW_o/?igsh=MWx3OTU1MnY2aGN0Zw==
मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या टोनी याने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक भावनिक पोस्ट करत लिहिले,
’17 जुलै 2014 पासून रियाल माद्रिद संघात आल्यावर माझे करिअर बदलले. या संघासाठी मी दहा वर्षे खेळलो आणि हाच माझा अखेरचा संघ असेल. युरो कपनंतर मी थांबणार आहे. माझी नेहमी इच्छा होती मी कारकिर्दीच्या सर्वात चांगल्या टप्प्यावर निवृत्त व्हावे. युरो कप फायनल जिंकून ही इच्छा पूर्ण होऊ शकते.’
टोनी याने आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण विजेते पदे आपल्या संघाला जिंकून दिली होती. रियाल संघात येण्यापूर्वी बायर्न म्युनिक संघासाठी त्याने तीन वेळा बुंदेसलीगा स्पर्धा जिंकलेली. तर रियाल सोबत चार वेळा ला लीगा आपल्या नावे केली. युएफा चॅम्पियन्स लीग अंतिम सामन्यात बोर्शुआ डॉर्टमंड संघाविरुद्ध तो आपला अखेरचा क्लब सामना खेळणार आहे.
(German And Real Madrid Midfielder Toni Kroos Annouced Retirement)