IPL 2024|आयपीएल 2024 ची अखेर रविवारी (26 मे) झाली. अंतिम सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. यासह केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएल आपल्या नावे केली. स्पर्धेच्या समाप्तीनंतर आता स्पर्धेत दिल्या जाणाऱ्या सर्व पुरस्कारांची यादी समोर आली आहे.
विजेता- कोलकाता नाईट रायडर्स (तिसरे विजेतेपद)
उपविजेता- सनरायझर्स हैदराबाद
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू- सुनील नरीन (केकेआर)
सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप)- विराट कोहली (आरसीबी)
सर्वाधिक बळी (पर्पल कॅप)- हर्षल पटेल (पंजाब किंग्स)
खेळभावनेने खेळणारा संघ (फेअर प्ले)- सनरायझर्स हैदराबाद
सर्वाधिक षटकार- अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद)
सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू (एमर्जिंग प्लेअर)- नितिश रेड्डी (सनरायझर्स हैदराबाद)
सर्वोत्तम झेल- रमनदीप सिंग (कोलकाता नाईट रायडर्स)
सर्वाधिक स्ट्राईक रेट- जॅक फ्रेझर-मॅकगर्क (दिल्ली कॅपिटल्स)
सर्वोत्तम स्टेडियम आणि खेळपट्टी- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम (हैदराबाद)
(IPL 2024 All Awards List Orange Cap Purple Cap MVP Player Emerging Player Fairplay)