Breaking News

Avinash Sable ने 36 वर्षांचा वनवास संपवला! भारताच्या खात्यात एशियन ऍथलेटिक्सचे सुवर्ण

Avinash Sable Won Gold In Asian Athletics 2025: भारताचा अनुभवी स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये त्याने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकले. भारताने तब्बल 36 वर्षानंतर या प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. 

Avinash Sable Won Gold In Asian Athletics 2025

भारताचे या प्रकारातील हे तिसरे सुवर्ण पदक ठरले. अविनाश याने 8:20:92 अशी वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने जपानच्या युतारो निनाए याला मागे सोडले. भारतासाठी या प्रकारात पहिले सुवर्णपदक हरबैल सिंग यांनी 1975 मध्ये जिंकले होते. त्यानंतर 1989 मध्ये अखेरच्या वेळी दीना राम यांना सुवर्ण जिंकण्यात यश आलेले. स्वतः अविनाशने 2019 मध्ये कांस्यपदक आपल्या नावे केलेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

Avinash Sable Won Gold In Asian Athletics 2025

इ साल कप नमदे! तब्बल 9 वर्षांनी RCB आयपीएल फायनलमध्ये, पंजाबची क्वालिफायरमध्ये शरणागती