
Kabaddi News| बांगलादेशमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा असलेल्या बंगबंधू कपसाठी (Bangabandhu Cup 2024) विविध देशांचे संघ जाहीर केले जात आहेत. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान संघ या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत.
मागील तीन वर्षांपासून बांगलादेशमध्ये ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली जाते. या तीनही वेळेस यजमान बांगलादेश संघ विजेता ठरला आहे. यंदा देखील तेच स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. या स्पर्धेला 26 मे पासून सुरुवात होईल. तत्पूर्वी 25 मे रोजी संघांची चार गटात विभागणी केली जाईल.
यावेळी स्पर्धेत यजमान बांगलादेशसह आशिया खंडातील नेपाळ, श्रीलंका, इराक, श्रीलंका, मलेशिया, थायलंड, जपान व इंडोनेशिया हे संघ आहेत. तर आफ्रिका खंडातील युगांडा व केनिया स्पर्धेत खेळताना दिसतील. युरोपमधील एकमेव पोलंड संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे.
(4th Bangabandhu Kabbadi Cup Starts On 26 May)