Breaking News

इ साल कप नमदे! तब्बल 9 वर्षांनी RCB आयपीएल फायनलमध्ये, पंजाबची क्वालिफायरमध्ये शरणागती

RCB
Photo Courtesy: X/RCB

RCB Into IPL 2025 Final: आयपीएल 2025 मध्ये गुरुवारी (29 मे) पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB v PBKS) यांच्या दरम्यान पहिल्या क्वालिफायरचा सामना खेळला. पंजाबच्या घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात आरसीबीने एकतर्फी वर्चस्व गाजवले. पंजाबला केवळ 101 धावांवर रोखल्यानंतर आरसीबीने केवळ दोन गडी गमावत हे लक्ष्य पार केले. यासह आरसीबी अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला.

RCB Into IPL 2025 Final

साखळी फेरीनंतर पहिल्या दोन स्थानावर राहिलेल्या या संघांमध्ये हा सामना खेळला गेला. आरसीबीने धारदार गोलंदाजी करत पंजाबला केवळ 101 धावांवर सर्वबाद केले. यानंतर फिल सॉल्टने वादळी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. शानदार गोलंदाजी करणारा जोश हेझलवूड सामनावीर ठरला.

आरसीबीने 2016 नंतर प्रथमच अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. त्यावेळी त्यांना सनरायझर्स हैदराबाद कडून पराभूत व्हावे लागलेले. त्याआधी 2009 व 2011 अशी दोन वर्ष त्यांनी अंतिम सामना खेळलेला. मात्र, या दोन्ही वेळी त्यांच्या पदरी अपयश पडलेले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

(RCB Into IPL 2025 Final)