
Shubman Gill Team India New Test Captain: आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा नवा कर्णधार म्हणून शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नावाची घोषणा केली गेली. रोहित शर्मा निवृत्त झाल्याने आता पुढील काळात गिल भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
Shubman Gill Team India New Test Captain
रोहित शर्मा निवृत्त झाल्यानंतर भारतीय संघाचा पुढील कसोटी कर्णधार होणार याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. यामध्ये गिल याच्या व्यतिरिक्त रिषभ पंत, जसप्रीत बुमराह व केएल राहुल यांच्या नावाची जोरदार चर्चा होते. मात्र, अखेर कर्णधारपदाची माळ गिलच्या गळ्यात पडली. तर, पंत संघाचा उपकर्णधार असेल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
गिल याने यापूर्वी काही आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच तो भारताच्या वनडे संघाचा नियमित उपकर्णधारही आहे. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सचा कर्णधार असून, त्याच्या नेतृत्वात संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली दिसून येते. मात्र, राष्ट्रीय संघाचे कसोटी तो कसे नेतृत्व करतो याकडे सर्वांची नजर असेल.
Shubman Gill New Test Captain Of India
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।