
India Tour Of England 2025: भारतीय क्रिकेट संघाची आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. भारतीय इंग्लंडमध्ये जून-जुलै महिन्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी 18 सदस्यीय संघ घोषित केला गेला असून, कसोटी संघाच्या नव्या कर्णधारपदी शुबमन गिल (Shubman Gill) याची वर्णी लागली आहे.
India Tour Of England 2025 India Test Squad
मुंबई येथे झालेल्या निवड समितीच्या बैठकीत या संघाची घोषणा केली गेली. यापुढे भारतीय संघाचा कसोटी कर्णधार म्हणून शुबमन गिल हा जबाबदारी सांभाळेल. तर, उपकर्णधार म्हणून रिषभ पंत दिसेल. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा या मालिकेतील काही सामने खेळणार नसल्याचे, निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले. तर, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या मालिकेसाठी उपलब्ध नसेल.
https://x.com/BCCI/status/1926187959910269166?t=A2AolPx-cNJtcHcF1HeK8g&s=19
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाचा भाग असलेल्या सर्फराज खान व हर्षित राणा यांना यावेळी संधी मिळालेली नाही. तर, करूण नायर जवळपास नऊ वर्षाच्या कालावधीनंतर संघात पुनरागमन करेल. याव्यतिरिक्त सलामीवीर अभिमन्यू ईस्वरन व साई सुदर्शन हे देखील संघाचा भाग आहेत. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हाय या मालिकेतून कसोटी पदार्पण करू शकतो. तर, मागील दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी केलेला अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा संघात सामील झाला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ– शुबमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार) यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल, अभिमन्यू ईस्वरन, ध्रुव जुरेल, करूण नायर, रविंद्र जडेजा, नितिशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
India Squad For Test Series Against England
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।