Breaking News

Hardik Natasha Seprated| लग्नाच्या 4 वर्षानंतर हार्दिकच्या पत्नीने निवडली नवी वाट? वाचा काय घडले

hardik natasa seprated
Photo Courtesy: X/Mumbai Indians

Hardik Natasa Seprated Rumours|

भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या बाबतीत एक बातमी समोर येत आहे. हार्दिकची पत्नी नतासा स्टॅन्कोविक (Natasa Stankovic) हिने आपल्या इंस्टाग्राम बायोमधून पंड्या आडनाव हटवले असून, हार्दिक सोबतचे आपले फोटो देखील डिलीट केले आहेत. त्यामुळे ते दोघे विभक्त झाल्याच्या बातम्यांना पेव फुटले आहे.

https://www.instagram.com/p/C7V1vXiN3lf/?igsh=MW5oZDQ3MjJvZzUzcA==

मागील काही दिवसांपासून हार्दिक सातत्याने चर्चेत आहे. गुजरात टायटन्स संघ सोडल्यानंतर मुंबई इंडियन संघाचा तो कर्णधार बनला. मात्र, अनेक सामन्यात प्रेक्षकांनी तो मैदानावर आल्यावर बू केले. तसेच मुंबईचा संघ आयपीएल 2024 मध्ये अखेरच्या स्थानी राहिला. अशात अर्थात हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यातूनही अशीच धक्कादायक बातमी आली.

नताशा हिने आपल्या इंस्टाग्राम बायोमधून पंड्या नाव हटवल्यानंतर हार्दिक सोबतचे फोटो देखील डिलीट केले. तसेच तिने आयपीएलच्या एकाही सामन्यासाठी हजेरी लावली नाही. तर हार्दिकने देखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या. अद्याप या दोघांकडून या नात्याविषयी काहीही बोलले गेले नसले तरी सोशल मीडिया तसेच माध्यमांत या गोष्टीची भरपूर चर्चा होत आहे.

हार्दिक व नतासा यांनी 2020 मध्ये लग्न केले होते. त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा देखील आहे. नतासा ही सार्बियाची असून, बॉलीवूड डान्सर तसेच मॉडेल म्हणून तिने नाव कमावले होते.

(Hardik Natasa Seprated Rumours Natasha Remove Pandya Name And Photos)

One comment

  1. Hi, Neat post. There’s an issue together with your web site in internet explorer, could test thisK IE nonetheless is the market chief and a big portion of other people will pass over your magnificent writing because of this problem.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *