
Virat Kohli Batting Stats Against Pakistan In T20 World Cup|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत रविवारी (9 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) असा रोमांचक सामना होणार आहे. टी20 विश्वचषकातील पाकिस्तानवरील आपले वर्चस्व कायम राखण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. भारताच्या या अपेक्षांचे सर्वात मोठे ओझे अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याच्या खांद्यावर असेल. विशेष म्हणजे विराटने आत्तापर्यंत पाकिस्तानविरुद्ध टी20 विश्वचषकात नेहमीच या अपेक्षांची पूर्तता केली आहे (Virat Kohli Stats Against Pakistan).
OG short from King Kohli🏏👑
Virat Kohli’s 18.5 Six rated as the greatest moment in T20🤯🏆
Fifty by Rishabh Pant in 32 balls🏅
6-6-6 by Hardik Pandya in a row🔥
Team India is all set for the Big Chase💯#T20WorldCup #T20WorldCup24
pic.twitter.com/nHNtWrxDtk— Sumit Kapoor (@moneygurusumit) June 1, 2024
विराट सर्वप्रथम 2012 टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यावेळी त्याने 61 चेंडूंमध्ये नाबाद 78 धावांची खेळी केली होती. तसेच एक बळी देखील मिळवला होता. त्यानंतर 2014 टी20 विश्वचषका 36 धावांची नाबाद खेळी करत त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. 2016 टी20 विश्वचषक स्पर्धेत देखील नाबाद राहण्याची कामगिरी करत, एका अवघड खेळपट्टीवर 37 चेंडूत नाबाद 55 धावा करत संघाला विजयी केले होते.
भारतीय संघाला विश्वचषक इतिहासात आतापर्यंत पाकिस्तानकडून एकच पराभव पत्करावा लागला आहे. 2020 टी20 विश्वचषकात भारताचा पराभव झाला होता. मात्र, तेव्हा देखील कर्णधार म्हणून खेळताना विराट याने सर्वाधिक 57 धावा केलेल्या. ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये झालेल्या टी20 विश्वचषकावेळी देखील विराटने आपला दर्जा दाखवताना, भारतीय संघ अडचणीत सापडलेला असताना नाबाद राहत 53 चेंडूत 82 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने हारिस रौफला मारलेला षटकार क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक मानला जातो (Virat Kohli 18.5).
विराटने आत्तापर्यंत टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध 5 सामने खेळताना 308 च्या अविश्वसनीय सरासरीने 308 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 132 इतका राहिला असून, चार अर्धशतके त्याच्या नावे आहेत.
(Virat Kohli Batting Stats Against Pakistan In T20 World Cup)