Indian Football Team New Captain|भारतीय फुटबॉल संघ (Indian Football Team) मंगळवारी (11 जून) फिफा विश्वचषक पात्रता फेरी (FIFA World Cup Qualifier 2026) मध्ये कतारविरुद्ध (INDvQTR) खेळेल. भारत 19 वर्षानंतर प्रथमच इतक्या मोठ्या स्तरावर दिग्गज सुनील छेत्री (Sunil Chhetri Retirement) याच्या विना खेळेल. तत्पूर्वी, भारतीय संघाच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा झाली आहे.
Gurpreet Singh Sandhu takes over as captain after Sunil Chhetri.
Onward and upward! 🇮🇳🧤#QATIND #FIFAWorldCup 🏆 #BlueTigers 🐯 #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/jgqXzIwokH
— Indian Football Team (@IndianFootball) June 11, 2024
मागील अनेक वर्षांपासून भारतीय फुटबॉलचा कणा तसेच कर्णधार राहिलेल्या सुनील छेत्री याने 6 जून रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपला अखेरचा सामना खेळला. त्यानंतर भारत आता आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात यजमान कतारविरूद्ध खेळेल. या सामन्यापासून भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी गोलकीपर गुरप्रीत सिंग संधू (Gurpreet Singh Sandhu) हा करेल.
संधू याने भारतासाठी आपला पहिला सामना 2011 मध्ये खेळला होता. सध्या 32 वर्षात असलेला संधू नियमितपणे भारतीय संघाचा सदस्य आहे. तो आयएसएल (ISL) मध्ये बेंगलोर एफसीचे प्रतिनिधित्व करतो. तसेच तो भारताबाहेर स्टॅबॅक संघाकडून युरोपा लीग खेळणारा पहिला भारतीय बनलेला. त्याने आत्तापर्यंत भारतासाठी 72 सामने खेळले आहेत.
फिफा विश्वचषक पात्रता फेरी 2026 मध्ये भारताने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. यामध्ये संघाला फक्त एक विजय मिळवता आला आहे. तर दोन सामन्यात बरोबरी व दोन सामन्यात पराभव पहावा लागला. सध्या भारतीय संघ आपल्या गटात दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, अखेरच्या सामन्यात आशियाई विजेत्या कतारचे मोठे आव्हान असणार आहे. एका गटातून केवळ दोनच संघ तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतील.
(Gurpreet Singh Sandhu Becomes New Indian Football Team Captain)