Breaking News

ऐतिहासिक! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला लोळवले! वनडे वर्ल्डकप पराभवाचा घेतला बदला, सेमीफायनलच्या आशा पल्लवित

Photo Courtesy: X/ACB

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 चा आठवा सामना ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान (AUS vs AFG) यांच्या दरम्यान खेळला गेला. सेंट विन्सेंट येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने इतिहास रचत ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी पराभूत (Afghanistan Beat Australia) केले. यासह त्यांनी उपांत्य फेरीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रथमच ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्याचा कारनामा केला आहे.

सुपर 8 मधील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज व इब्राहिम झादरान यांनी चुकीचा ठरवला. दोघांनी संथ मात्र मजबूत अशी सुरुवात अफगाणिस्तानला दिली. त्यांनी पहिल्या गड्यासाठी 118 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर त्यांचा डाव कोसळला व अवघ्या 31 धावांमध्ये त्यांचे सहा गडी बाद झाले. ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्स (Pat Cummins Hat-trick)याने सलग दुसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेतली. अफगाणिस्तानी निर्धारित 20 षटकात 148 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली.

या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेड खातेही खोलू शकला नाही. डेव्हिड वॉर्नर 3 व मिचेल मार्शने 12 धावा केल्या. मधल्या फळीतील स्टॉयनिस, वेड व डेव्हिड फारसे योगदान देऊ शकले नाहीत. अशावेळी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हा एकटा किल्ला लढवत होत. त्याने अर्धशतकी खेळी केली. मात्र, तळाचे फलंदाज योगदान देऊ न शकल्याने संघाला 21 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तानसाठी गुलबदीन नईब याने 4 तर नवीनने 3 बळी मिळवले.

(T20 World Cup 2024 Afghanistan Beat Australia In Super 8)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *