Breaking News

“तर मी सूर्याला बसवला असता”, विश्वविजयानंतर Rohit Sharma चा मोठा खुलासा

indian Cricketers Felicitate In Maharashtra Vidhan Bhavan
Photo Courtesy: X

Indian Cricketers Felicitate In Maharashtra Vidhan Bhavan: टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजेत्या भारतीय संघाचे 4 जुलै रोजी मायदेशात आगमन झाले. दिल्ली येथे स्वागत झाल्यानंतर संघाचे मुंबई येथे व्हिक्टरी परेड’ निघाली. त्यानंतरही खेळाडूंच्या सत्काराचा सिलसिला सुरू आहे. शुक्रवारी (5 जुलै) महाराष्ट्र विधानभवनात महाराष्ट्र सरकारतर्फे विश्वचषक विजेत्या संघातील चार महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सत्कार केला गेला.

मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करणारे चार खेळाडू भारतीय संघात सामील होते. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव, अष्टपैलू शिवम दुबे व युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल यांचा समावेश होता. या चारही खेळाडूंना महाराष्ट्र विधान भवनात सन्मानित केले गेले. तसेच या सर्वांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

या सत्काराला उत्तर देताना कर्णधार रोहित शर्मा याने सर्वांचे आभार मानले. त्याचवेळी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav Catch) याच्या झेलाविषयी विचारले असता तो म्हणाला,

“सूर्या आत्ताच म्हणला तो झेल हातात बसला. बरं झालं, झेल हातात बसला नाही तर मी त्याला बसवला असता.”

त्याच्या या हजरजबाबीपणामुळे सभागृहात हशा पिकला. दक्षिण आफ्रिका संघाला अखेरच्या षटकात 16 धावांची आवश्यकता असताना, पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलर याने फटकावलेला चेंडू सूर्यकुमार यादव याने सीमारेषेवर अप्रतिमरित्या टिपला. त्यामुळे संघाचा विजय तिथेच निश्चित झाला होता. या अंतिम सामन्यात भारतीय संघाने सात धावांनी विजय मिळवत, दुसऱ्यांदा विश्वचषक आपल्या नावे केला.

(Four Indian Cricketers Felicitate In Maharashtra Vidhan Bhavan Rohit Talk On Suryakumar Catch)