Breaking News

लखपती बनायचंय का? MPL 2025 पाहायला जा, वाचा सविस्तर

mpl 2025
Photo Courtesy: X/MPL

MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र प्रिमियर लीग (Maharashtra Premier League) आयोजित करत आहे. गहुंजे येथील  आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडणार आहे. यासोबतच प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL 2025) देखील खेळली जाईल. या दोन्ही स्पर्धा एकत्रितरित्या 4 जून ते 22 जून या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेसाठी स्टेडियममध्ये सामना पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना लखपती होण्याची संधी असेल.

MPL 2025 Catch And Win Contest

पहिल्या दोन यशस्वी हंगामानंतर एमपीएलचा तिसरा हंगाम सुरू होण्यासाठी अगदी काही दिवस शिल्लक आहेत. एमपीएल व डब्ल्यूएमपीएल या दोन्ही स्पर्धांसाठी प्रेक्षकांना या वर्षे देखील विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. मात्र, यावेळी प्रेक्षकांना मैदानात झेल पकडून लखपती देखील होता आहे.

https://www.instagram.com/p/DJ69eQeIAXY/?img_index=1

एमपीएलची भागीदार असलेल्या ATENX या कंपनीने फलंदाजाने स्टँडमध्ये मारलेला षटकार एका हातात झेलणाऱ्या चाहत्यांना रोख 25,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून तब्बल 12 लाख रुपये चाहते जिंकू शकतात. यासोबतच एमपीएल अंतिम सामन्यात असे झेल पकडणाऱ्या दोन प्रेक्षकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे रोख रक्कम देण्यात येईल.

या व्यतिरिक्त सामन्यानंतर देखील प्रेक्षकांना बक्षीस जिंकण्याची संधी असणार आहे. बॉलिंग मशीनच्या मदतीने काही फलंदाज प्रेक्षकांमध्ये चेंडू मारतील. तो झेल एका हातात पकडणाऱ्या प्रेक्षकांना प्रत्येकी 2000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल. सोबतच सामन्याआधीच्या नाणेफेकीसाठी देखील चाहत्यांना मैदानावर जाता येणार आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

या दोन्ही कॉन्टेस्टसाठी क्रिकेटप्रेमींना ATNEX यांच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही या स्पर्धांसाठी पात्र ठरू शकता.

(MPL 2025 Catch And Win Contest)

हे देखील वाचा: Avinash Sable ने 36 वर्षांचा वनवास संपवला! भारताच्या खात्यात एशियन ऍथलेटिक्सचे सुवर्ण

इ साल कप नमदे! तब्बल 9 वर्षांनी RCB आयपीएल फायनलमध्ये, पंजाबची क्वालिफायरमध्ये शरणागती