Breaking News

PKL 12 Auction: या खेळाडूंवर सर्वांचीच नजर, कोट्यावधींची लागणार बोली

PKL 12 AUCTION
Photo Courtesy: X

PKL 12 Auction: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) साठी खेळाडूंचा होणारा लिलाव 31 मे व 1 जून रोजी पार पडणार आहे. या लिलावात अनेक बडे स्टार खेळाडू दिसतील. यातील काही खेळाडू असे असतील ज्यांच्यावर कोट्यावधींची बोली लागू शकते. त्या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया.

PKL 12 Auction Players To Watch Out

1) पवन सेहरावत (Pawan Seharawat)- भारतीय संघाचा अनुभवी रेडर पवन सेहरावत हा पुन्हा एकदा लिलावात उतरला आहे. मागील वर्षी तमिल थलाईवाज संघाने त्याच्यावर मोठी बोली लावली होती. मात्र, पवन आणि त्याचा संघ फारशी चांगली कामगिरी करू न शकल्याने पवनला रिलीज केले गेले. असे असले तरी त्याच्यावर यावेळी देखील कोटींची बोली लागण्याची अपेक्षा आहे.

2) नवीन कुमार (Naveen Kumar)- पाचव्या हंगामापासून सलग दबंग दिल्लीसाठी खेळणारा रेडर नवीन कुमार प्रथमच लिलावाचा भाग असेल. नवीन याला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच फ्रॅंचायझी जोर लावताना दिसू शकतात. नवीन एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा नवीन आपल्या वेगवान रेडींगने सामन्याचा नूर पालटण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे तो या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरल्यास आश्चर्य वाटणार नाही.

3) मोहम्मद रेझा शादलू (M Reza Shadloui)- इराणचा अनुभवी लेफ्ट कॉर्नर शादलू हा मागील दोन हंगामात लिलावाचा भाग होता आणि दोन्ही वेळी त्याने रेकॉर्डब्रेक रक्कम मिळवली. दहाव्या हंगामात पुणेरी पलटण व अकराव्या हंगामात हरियाणा स्टीलर्स या संघांना विजेते बनवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे यावर्षी देखील त्याला कदाचित नवा संघ मिळू शकतो. असे असले तरी त्याची बोली ही तगडी असेल यात शंका नाही.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

4) अर्जुन देशवाल (Arjun Deshwal)- गेली अनेक वर्ष जयपूर पिंक पँथर्स संघाचे नेतृत्व करणारा अर्जुन देशवाल हा देखील लिलावात असणार आहे. रेडींग आणि नेतृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर अर्जुन याने स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे त्याची बोली एक कोटींपेक्षा जास्त निश्चितपणे जाऊ शकते. जयपूरकडे त्याच्यासाठी एफबीएम कार्ड वापरण्याची देखील संधी असेल. ज्यामुळे तो पुन्हा एकदा जयपूरचाच भाग होऊ शकतो.

5) देवांक दलाल (Devank Dalal)- पटना पायरेट्स संघाने पीकेएल 11 मध्ये अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. त्यांच्या या यशात युवा रेडर देवांक दलाल याने सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यावेळी देवांक लिलावात असल्याने सर्व फ्रॅंचाईजी त्याच्यासाठी बोली लावताना दिसू शकतात. त्यामुळे आपल्या दुसऱ्याच लिलावात तो करोडपती होण्याची दाट शक्यता आहे.

(PKL 12 Auction Players To Watch Out)

हे देखील वाचा: इ साल कप नमदे! तब्बल 9 वर्षांनी RCB आयपीएल फायनलमध्ये, पंजाबची क्वालिफायरमध्ये शरणागती

लखपती बनायचंय का? MPL 2025 पाहायला जा, वाचा सविस्तर