
India Champions Pulled Out From WCL 2025: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) या स्पर्धेतून मोठी बातमी समोर येतेय. स्पर्धेचे गतविजेते असलेल्या इंडिया चॅम्पियन्स संघाने उपांत्य फेरीतून माघार घेतली आहे. मात्र, त्यानंतरही भारताच्या दिग्गज खेळाडूंचे कौतुक होतेय.
India Champions Pulled Out From WCL 2025
वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघाला पराभूत केल्यानंतर इंडिया चॅम्पियन्सने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. भारताचा उपांत्य सामना पाकिस्तान चॅम्पियन्स (India Champions vs Pakistan Champions) विरुद्ध होणार होता. मात्र, सध्याचे राजकीय परिस्थिती पाहता भारताच्या खेळाडूंनी या सामन्यात उतरण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तान संघाला थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला आहे. भारताने यापूर्वी साखळी सामन्यात देखील पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिलेला.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. अशा स्थितीत पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट देखील न खेळण्याची इच्छा भारतीय व्यक्त करत आहेत. त्यामुळेच भारताच्या दिग्गज खेळाडूंनी हा निर्णय घेतला. मात्र, आगामी एशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) असा सामना नियोजित आहे. वर्तमान भारतीय संघ व बीसीसीआय या सामन्याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: तब्बल 4 बदलांसह इंग्लंड खेळणार Oval Test, भारताकडे मालिका बरोबरीत आणण्याची सुवर्णसंधी
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।