Breaking News

PKL 12 Auction: युवा देवांक दलालची 2 कोटींच्या पुढे भरारी, आशू-अर्जुनही करोडपती

PKL 12 AUCTION
Photo Courtesy: X/Pro Kabaddi

PKL 12 Auction: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) च्या लिलावाला शनिवारी (31 मे) सुरुवात झाली.‌ स्पर्धेतील 12 संघ विविध खेळाडूंसाठी बोली लावताना दिसले. लिलावातील पहिलाच खेळाडू असलेल्या इराणच्या मोहम्मद रेझा शादलू (M Reza Shadloui) याला दोन कोटीच्या पुढे बोली लागली. डिफेंडर योगेश याच्यासाठी बेंगलोरने 1 कोटी 12 लाख 50 हजार रूपये मोजले.

दबंग दिल्लीने आशु मलिक (Ashu Malik) याच्यासाठी तब्बल 1.90 कोटी रुपयांचे एफबीएम कार्ड वापरले. तमिल थलाईवाजने अर्जुन देशवाल (Arjun Deshwal) याला 1 कोटी 40 लाख 50 हजार रुपयांची सर्वात मोठी बोली लावली. युवा रेडर देवांक दलाल (Devank Dalal) याच्यासाठी बंगाल वॉरियर्सने 2 कोटी 20 लाख 50 हजाराची सर्वोच्च बोली लावली.

PKL 12 Auction

लिलावात पहिलेच नाव अष्टपैलू शादलू याचे आले. गुजरात जायंट्सने 30 लाखांच्या बोलीपासून सुरुवात केल्यानंतर पटना पायरेट्स व मुंबईने लिलावात उडी घेत काही क्षणात त्याची बोली ‌ दीड कोटीपर्यंत नेली. अखेर बेंगळूरू बुल्स व गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान दोन कोटीच्या पुढे घमासान झाले. गुजरातने 2 कोटी 23 लाखांची सर्वात मोठी बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. शादलू याला पीकेएल 10 मध्ये पुणेरी पलटणने 2 कोटी 35 लाख व पीकेएल 11 मध्ये हरियाणा स्टीलर्सने 2 कोटी 7 लाखात विकत घेतलेले. त्यानंतर त्याने या दोन्ही संघांना विजेता बनवलेले.

इराणचा अनुभवी लेफ्ट कॉर्नर फझल अत्राचली याला मात्र केवळ एकच बोली लागली. दबंग दिल्लीने तीस लाखांच्या बेस प्राईसवर त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. तर, कोट्यावधीची अपेक्षा असलेल्या पवन सेहरावत (Pawan Seharawat) याला केवळ 59 लाख 60 हजारांचीच बोलू लागली. त्याला तमिल थलाईवाजने आपल्या संघाचा भाग बनवले. युवा रेडर भरत याच्यासाठी तेलगू टायटन्सने 81 लाख रुपये मोजले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

मागील हंगामात दिल्लीसाठी खेळलेला बचावपटू योगेश याच्यासाठी बेंगलोर बुल्सने एक कोटी साडेबारा लाख रुपये मोजले. रेडर आशू मलिक याला बंगाल वॉरियर्सने 1.90 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केले होते. मात्र, दिल्लीने दोन वर्षासाठी एफबीएम वापरत त्याला आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवले.

(PKL 12 Auction Shadloui Get 2.23 Cr)

हे देखील वाचा: PKL 12 Auction: या खेळाडूंवर सर्वांचीच नजर, कोट्यावधींची लागणार बोली