
T20 Leagues In Maharashtra: जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलची 3 जून रोजी समाप्ती होत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या या लीगनंतर अनेक राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीग खेळल्या जाणार आहेत. एकट्या महाराष्ट्रातच 4 जूनपासून तब्बल पाच टी20 लीग होतील.
T20 Leagues In Maharashtra From 4 June
आयपीएल संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) ची सुरुवात होईल. हा स्पर्धेचा तिसरा हंगाम असेल. या स्पर्धेत सहा संघ खेळताना दिसणार आहेत. एमपीएलचा अंतिम सामना 22 जून रोजी होईल. एमपीएलमध्ये ऋतुराज गायकवाड व राहुल त्रिपाठी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खेळणार आहेत. एमपीएलसोबतच डब्ल्यूएमपीएल (WMPL) या महिला क्रिकेटपटूंच्या लीगची सुरुवात देखील पाच जूनपासून होईल. या स्पर्धेत भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना, किरण नवगिरे, तेजल हसबनीस व अनुजा पाटील सहभागी होतील. चार संघांच्या या स्पर्धेचा अंतिम सामना 14 जून रोजी होणार आहे.
क्रिकेटमध्ये टॅलेंट आपलं भारी,
साथ द्या आता, हीच खरी जबाबदारी!
टिकिटं फ्री, धमाल भारी,
मैदानात येऊन द्या हिरोंना उभारी!Adani MPL & Adani WMPL सुरू होतेय ४ जून २०२५, ६ वा. पासून!
सहकुटुंब सहपरिवार मैदानात यायला विसरू नका! एन्ट्री पूर्णपणे FREE!#AdaniMPL pic.twitter.com/YxhrdIgCtM— MPLT20Tournament (@mpltournament) May 31, 2025
एमपीएलप्रमाणेच 4 जूनपासूनच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई टी20 लीग 2025 (Mumbai T20 Leagues 2025) या स्पर्धेला सुरुवात होईल. तब्बल सहा वर्षानंतर ही स्पर्धा खेळली जातेय. नऊ दिवस चालणार आहे या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा भरणा आहे. यामध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शिवम दुबे व पृथ्वी शॉ हे खेळताना दिसतील.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
महाराष्ट्र व मुंबई क्रिकेट संघटनांसह विदर्भ क्रिकेट संघटना देखील पहिल्या वर्षी स्वतःची टी20 लीग सुरू करत आहे. सहा संघांच्या विदर्भ प्रो टी20 लीग 2025 (Vidarbha Pro T20 League 2025) स्पर्धेला 5 जून पासून सुरुवात होईल. या लीगमध्ये सर्वांची नजर भारतीय यष्टीरक्षक जितेश शर्मा याच्यावर असेल. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या महिला खेळाडूंसाठी देखील तीन संघांची अशाच प्रकारची स्पर्धा होणार आहे.
(T20 Leagues In Maharashtra In June)
हे देखील वाचा: तूच खरा हिटमॅन! Rohit Sharma ने IPL 2025 Eliminator मध्ये केले दोन अद्वितीय कारनामे
मुंबईने केले गुजरातला IPL 2025 मधून एलिमिनेट! पलटणची क्वालिफायर 2 मध्ये थाटात एंट्री