
IPL 2025 Eliminator: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स (MI v GT) समोरासमोर आले होते. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 228 धावा उभ्या केल्या. या मोठ्या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन (Sai Sudarshan) याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याला वॉशिंग्टन सुंदर व रुदरफोर्ड यांनी साथ दिली. मात्र, गुजरातला हे आव्हान पार करता आले नाही. तर, मुंबई इंडियन्सला या विजयामुळे क्वालिफायर 2 मध्य प्रवेश मिळाला. या सामन्यात त्यांना पंजाब किंग्स विरुद्ध खेळावे लागेल.
Mumbai Indians Eliminate Gujrat Titans From IPL 2025
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने घेतला. जॉनी बेअरस्टो व रोहित शर्मा या जोडीने सातव्या षटकातच 84 धावा जोडून मुंबईला दमदार सुरुवात दिली. बेअरस्टो 47 धावांवर बाद झाल्यानंतर रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहित ने 81 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनी अनुक्रमे 33 व 25 धावांचे योगदान दिले. अखेर कर्णधार हार्दिकने 22 धावा बनवत संघाला 228 पर्यंत नेले.
https://x.com/IPL/status/1928514545900990880?t=r40JFhrsUE9cE07wjHswNg&s=19
या मोठ्या धावांचा पाठलाग करताना गुजरातचा कर्णधार शुबमन गिल खातेही खोलू शकला नाही. मात्र, साई सुदर्शन व कुसल मेंडिस यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मेंडीस हिटविकेट स्वरूपात बाद झाल्यावर वॉशिंग्टन सुंदर याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत आक्रमक 48 धावा केल्या. साई सुदर्शन याने देखील आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक पूर्ण केल्या. दोघांच्या 84 धावांच्या भागीदारीने सामना गुजरातकडे गेला. मात्र, जसप्रीत बुमराह याने सुंदरला त्रिफळाचित करत मुंबईला सामन्यात पुनरागमन करून दिले.
पुढच्या षटकात ग्लेसनने साई सुदर्शनला 80 धावांवर बाद करत मुंबईला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर शाहरुख खान, रुदरफोर्ड व तेवतिया यांनी प्रयत्न केले. मात्र, ते 208 पर्यंतच मजल मारू शकले. मुंबईने वीस धावांनी सामना जिंकत, क्वालिफायर 2 मध्ये आपली जागा निश्चित केली. अहमदाबाद येथे 1 जून रोजी पंजाबविरुद्ध ते या सामन्यात खेळतील.
Mumbai Indians Eliminate Gujrat Titans From IPL 2025
हे देखील वाचा: तूच खरा हिटमॅन! Rohit Sharma ने IPL 2025 Eliminator मध्ये केले दोन अद्वितीय कारनामे
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।