Breaking News

Rohit Sharma Instagram Story: हिटमॅनच्या इंस्टा स्टोरीने BCCI ला चपराक, क्रिकेटवर्तुळात नव्या चर्चेला उधाण

rohit sharma instagram stoty
Photo Courtesy: X

Rohit Sharma Instagram Story: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन संघाचा प्रमुख फलंदाज असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमी चर्चेत असतो. रविवारी (20 एप्रिल) झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात त्याने वादळी खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. त्यानंतर आता त्याने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली असून, त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Rohit Sharma Instagram Story After CSK Match

चेन्नईविरुद्ध धावांचा पाठलाग करताना रोहितने नाबाद 76 धावांची खेळी केली. सलग अपयशी ठरल्यानंतर त्याने या हंगामात प्रथमच अर्धशतक पूर्ण केले. आपल्या या कामगिरीचे श्रेय त्याने भारताचा माजी सहाय्यक प्रशिक्षक व नुकताच केकेआर संघाचा सहाय्यक प्रशिक्षक झालेल्या अभिषेक नायर (Abhishek Nayar) याला दिले. त्याने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत ‘थँक्स ब्रो अभिषेक नायर’ असे लिहिले.

काही दिवसांपूर्वीच अभिषेक नायर याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सहाय्यक प्रशिक्षक पदावरून दूर केले होते. त्यानंतर तो लगेचच केकेआर संघाच्या ताफ्यात दाखल झाला. रोहितच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून अनेक जण अंदाज लावत आहेत की, रोहितला अभिषेक नायर हा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून अजूनही हवा होता.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व कर्णधार रोहित शर्मा यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरू होती. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. परंतु, आता पुन्हा एकदा प्रशिक्षक व कर्णधार यांच्यात सुसंवाद नसल्याचा अंदाज लावला जात आहे.

(Rohit Sharma Instagram Story For Abhishek Nayar)

हे देखील वाचा- BCCI Central Contracts जाहीर, 32 खेळाडूंवर बरसणार पैसा