Mohammed Siraj Welcome In Hyderabad: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) विजेता भारतीय संघ गुरुवारी (4 जुलै) रोजी भारतात दाखल झाला. दिल्ली आणि मुंबई येथे जंगी स्वागत झाल्यानंतर, आता सर्व खेळाडू आपापल्या शहराकडे रवाना झाले आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा शुक्रवारी (5 जुलै) हैदराबादमध्ये पोहोचला. त्यावेळी त्याच्या हजारो चाहत्यांनी विमानतळापासूनच त्याचे स्वागत केले.
भारतीय संघाचे गुरुवारी मुंबई येथे मोठ्या जल्लोषात स्वागत झालेले. बीसीसीआयने आयोजित केलेल्या ‘व्हिक्टरी परेड’ ला जवळपास दोन लाख लोक उपस्थित असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर आता सर्व खेळाडू आपापल्या शहराकडे रवाना झाले.
CROWD TO CELEBRATE THE WORLD CUP HERO, SIRAJ IN HYDERABAD 🥶🇮🇳 pic.twitter.com/gIhfPSg1Pu
— Johns. (@CricCrazyJohns) July 5, 2024
मोहम्मद सिराज हैदराबाद येथे जाण्याआधीच त्याच्या मिरवणुकीची तयारी झाली होती. विमानतळापासून त्याच्या घरापर्यंत ठीकठिकाणी सिराज व भारतीय संघाचे बॅनर लावण्यात आलेले. सरोजिनी देवी आय हॉस्पिटल ते ईदगाह मैदान अशी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. सिराज याने देखील आपल्या चाहत्यांना निराश न करता आपल्या गाडीच्या सनरुफमधून बाहेर येत सर्वांचे अभिवादन स्वीकार केले. या रॅलीमध्ये जवळपास 20 हजार लोक सहभागी झाल्याचे सांगण्यात येतेय.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
सिराज याने या विश्वचषकात तीन सामने खेळताना केवळ एक बळी मिळाला. सुपर 8 मध्ये फिरकी गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या असल्याने कुलदीप यादव यांनी संघात स्थान बनवले होते.
(Mohammed Siraj Grand Welcome In Hyderabad After T20 World Cup 2024 Win)
“तर मी सूर्याला बसवला असता”, विश्वविजयानंतर Rohit Sharma चा मोठा खुलासा