![abhishek sharma](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/07/abhishek-sharma-century.jpg)
Abhishek Sharma Century: झिम्बाब्वे विरूद्ध भारत (ZIM vs IND) यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (7 जुलै) हरारे येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना शून्यावर बाद झालेला सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. त्याने या सामन्यात 46 चेंडूंमध्ये वादळी शतक झळकावले.
2ND T20I. 13.5: Wellington Masakadza to Abhishek Sharma 6 runs, India 147/1 https://t.co/yO8XjNqmgW #ZIMvIND
— BCCI (@BCCI) July 7, 2024
पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर या सामन्यात भारतीय संघाला खराब सुरुवात मिळाली. कर्णधार शुबमन गिल स्वस्तात बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा व ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरला. सुरुवातीला सांभाळून खेळल्यानंतर त्यांनी धावांचा वेग वाढवला.
पहिल्या सामन्यातील अपयश विसरून आणि सुरुवातीला मिळालेल्या जीवनाचा फायदा घेत अभिषेक याने 33 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढील 50 धावा करण्यासाठी त्याने केवळ तेरा चेंडू घेतले. त्याने सलग तीन षटकार मारत आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. त्याने सात चौकार व आठ षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. शतक पूर्ण झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.
भारतासाठी हे सामन्यांच्या हिशोबाने सर्वात वेगवान शतक ठरले. अभिषेक याने शतक झळकावण्यासाठी केवळ दोन सामने घेतले. यापूर्वी दीपक हुडा याने आपल्या तिसऱ्या टी20 सामन्यात शतक झळकावले होते.
(Abhishek Sharma Hits Century Against Zimbabwe)