Breaking News

David Warner : डेविड वॉर्नरचा निवृत्तीतून यू-टर्न? व्यक्त केली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा

David Warner : डेविड वॉर्नरचा निवृत्तीतून यू-टर्न? व्यक्त केली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा
Photo Courtesy: X/david warner

David Warner Retirement : टी20 विश्वचषक 2024 सह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची कारकिर्द संपुष्टात आली. यात ऑस्ट्रेलियाचा तीन वेळचा विश्वचषक विजेता क्रिकेटपटू आणि सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ टी20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. परंतु आता वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा दर्शवली आहे. 

वॉर्नरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. वॉर्नरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तो आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळून खूप आनंदी आहे. यावेळी वॉर्नरने आपण क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपातून निवृत्ती घेतली असल्याचेही स्पष्ट केले. आपल्या शानदार कारकिर्दीबद्दल त्याने आपल्या चाहत्यांचे आणि कुटुंबाचे आभार मानले. यानंतर वॉर्नरने लिहिले की, तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहील आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाल्यास ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यास तयार असेल.

पुढच्या वर्षी पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. वनडे स्वरुपात होणाऱ्या या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात निवड झाल्यास वॉर्नर निवृत्तीतून माघार घेऊ शकतो.

View this post on Instagram

 

A post shared by David Warner (@davidwarner31)

दरम्यान वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने ऑस्ट्रेलियासोबत तीन वेळा विश्वचषक जिंकला आहे. 2015 मध्ये, तो वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. 2021 साली ऑस्ट्रेलियाने प्रथमच टी20 विश्वचषक जिंकला आणि वॉर्नर या संघाचा महत्त्वाचा भाग होता. याशिवाय पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी वनडं विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातही वॉर्नर होता. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या विजयातही तो संघाचा महत्त्वपूर्ण भाग होता.