Breaking News

Ravi Bishnoi Catch Video: हा तर ‘जॉन्टी बिश्नोई’! अफलातून कॅच पाहून तुम्हीही असच म्हणाल

Ravi Bishnoi Catch Video: हा तर 'जॉन्टी बिश्नोई'! अफलातून कॅच पाहून तुम्हीही असच म्हणाल
Photo Courtesy: Screenshot/X

Ravi Bishnoi Catch :-  बुधवारी (10 जुलै) हरारेच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध झालेला तिसरा टी20 सामना (IND vs ZIM) भारतीय संघाने 23 धावांनी जिंकला. प्रभारी कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी 6 विकेट्स घेत झिम्बाब्वेला 159 धावांवर रोखले. यासह भारताने सलग दुसरा सामना जिंकत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटपटू रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) याचा एक झेल चर्चेचा विषय ठरला. 

भारताच्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गोलंदाज रवि बिश्नोईने झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रायन ब्रॅनेटचा अद्भुत झेल टिपला, ज्याला पाहून क्रिकेटरसिंकांना दिग्गज जॉन्टी रोड्सची आठवण झाली असावी. त्याचे झाले असे की, झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रायनने आवेश खानच्या सामन्यातील चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर बॅकवर्ड पॉईन्टकडे फटका मारला. त्यावेळी तिथे क्षेत्ररक्षणासाठी सावध उभा असलेल्या बिश्नोईने चपळतेने हवेत उडी मारली आणि वेगाने येणारा चेंडू दोन्ही हातांनी झेलला.

अगदी असाच झेल दक्षिण आफ्रिकेचा महान क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्सनेही टिपला होता. बिश्नोईनेही हा झेल टिपताना जॉन्टीसारखीच चपळता दाखवली. त्याच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाहवाह मिळवत आहे.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना कर्णधार गिल व यशस्वी यांनी भारतीय संघाला जोरदार सुरुवात देत 67 धावा जमवल्या. यशस्वी याने 36 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या बाजूने गिलने मालिकेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 66 धावा केल्या. मागील सामन्यात शतक झळकावणारा अभिषेक शर्मा केवळ 10 धावा करू शकला. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने 28 चेंडूत 49 धावा करत भारतीय संघाला 182 पर्यंत पोहोचवले.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. खलील, आवेश व वॉशिंग्टन सुंदर यांच्या गोलंदाजी पुढे त्यांची अवस्था पाच बाद 39 अशी झाली. त्यानंतर लाईव्ह मडांडे व डिऑन मायर्स यांनी 77 धावांची मोठी भागीदारी केली. मडांडे याने 37 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर वेलिंग्टन मासकात्झा याच्यासोबत मायर्सने 43 धावा जोडल्या. मायर्सने आपल्या कारकीर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण करताना नाबाद 65 धावा केल्या. तर, मासकात्झा याने 18 धावा केल्या. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 बळी मिळवले.

(Ravi Bishnoi Catch Against Zimbabwe)