Breaking News

Maharashtra Government Decision: आनंदाची बातमी: महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी ‘शिंदे सरकार’ची ऐतिहासिक घोषणा, आंतरराष्ट्रीय स्तरावर…

MAHARASHTRA GOVERNMENT
Photo Courtesy: X

Maharashtra Government Decision For International Players: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील खेळाडूंसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवत पदक आणणाऱ्या खेळाडूंना थेट सरकारी नोकरीत समाविष्ट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली (Government Jobs For Maharashtra International Players).

नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये क्रीडा विभागाच्या अनेक निर्णयांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असलेल्या खेळाडूंना थेट महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरी देण्यात येईल. या खेळाडूंना क्रीडा कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्त केले जाईल. ऑलिंपिक्स, पॅरालिंपिक, राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना ही नोकरी मिळवण्याची संधी राहील. या निर्णयामुळे खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळेल असे बोलले जात आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

महाराष्ट्र सरकारने नुकत्याच टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या चार खेळाडूंचा सन्मान केला होता. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे व यशस्वी जयस्वाल यांना सरकारने तब्बल 11 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले. त्यानंतर भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी (Chirag Shetty) याने महाराष्ट्र सरकार क्रिकेट आणि इतर खेळांमध्ये भेदभाव करत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारचे कौतुक होत आहे.

(Maharashtra Government Offer Jobs For International Players CM Eknath Shinde Annouced)