![zim vs ind](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/07/gill-jaiswal.jpg)
ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe) आहे. शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शनिवारी (13 जुलै) मालिकेतील चौथा टी20 सामना खेळला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने दहा गडी राखून मोठा विजय मिळवला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत संघाने 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली.
4TH T20I. India Won by 10 Wicket(s) https://t.co/AaZlvFYFmF #ZIMvIND
— BCCI (@BCCI) July 13, 2024
मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने या सामन्यात एक बदल केला. आवेश खान यांच्या जागी तुषार देशपांडे याला पदार्पणाची संधी दिली. आतापर्यंत मालिकेत अपयशी ठरलेल्या झिम्बाब्वे संघाच्या सलामीवीरांनी या सामन्यात अर्धशतकी सलामी दिली. त्यानंतर त्यांचा डाव गडगडला. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत झिम्बाब्वेच्या डावाला वेसण घातली. अशा परिस्थितीत कर्णधार सिकंदर रझा याने 46 धावांची शानदार खेळी करत आपल्या संघाला 152 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
विजयासाठी मिळालेल्या 153 धावांचा पाठलाग करताना भारतासाठी कर्णधार शुबमन गिल व यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) ही जोडी मैदानात उतरली. त्यांनी पहिल्या षटकापासूनच फटकेबाजीला सुरुवात करत, सामना लवकर संपवण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली. दोघांनी देखील अर्धशतके करत संघाला 15.2 षटकात विजयी लक्ष्य साध्य करून दिले. जयस्वाल याने 53 चेंडूंमध्ये तेरा चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 93 धावा केल्या. तर गिलने मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण करताना 39 चेंडूंमध्ये 58 धावांचे योगदान दिले. जयस्वाल याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
(ZIM vs IND India Seal T20I Series Gill Jaiswal Shines)