Breaking News

वनडे आणि टी20 सामन्यांचे वेळापत्रक बदलले, जाणून घ्या IND vs SL मालिकेचे अपडेटेड शेड्यूल

IND vs SL Updated Schedule :- भारतीय संघ जुलैच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेचा दौरा (India Tour Of Sri Lanka) करणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 3 टी20 सामने आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्याचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते. आता या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले  आहेत.

भारत आणि श्रीलंका संघातील टी20 मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार असून शेवटचा सामना 30 जुलै रोजी होणार आहे. यानंतर 2 ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होईल आणि 7 ऑगस्टपर्यंत चालेल. दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही.

टी20 मालिकेत झाला हा बदल
यापूर्वी टी20 मालिकेतील पहिला सामना 26 जुलै, दुसरा सामना 27 जुलै आणि शेवटचा सामना 29 जुलै रोजी होणार होता. आता पहिला टी20 सामना 27 जुलै, दुसरा 28 जुलै आणि शेवटचा टी20 सामना 30 जुलैला खेळवला जाईल. सर्व सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

वनडे मालिकेत झाला हा बदल
यानंतर 1 ऑगस्टपासून वनडे मालिका सुरू होणार होती. पहिला वनडे सामना 1 ऑगस्टला, दुसरा 1 ऑगस्टला आणि शेवटचा वनडे सामना 7 ऑगस्टला खेळवला जाणार होता. आता अपडेटेड वेळापत्रकानुसार, पहिला वनडे सामना 2 ऑगस्टला होणार आहे. दुसरा आणि तिसरा वनडे सामना नियोजित दिवशीच खेळवला जाईल. वनडे मालिकेतील सर्व सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवले जातील.

टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी20: 27 जुलै
दुसरा टी20: 28 जुलै
तिसरा टी20: 30 जुलै

वनडे मालिकेचे वेळापत्रक
पहिली वनडे: 2 ऑगस्ट
दुसरी वनडे : 4 ऑगस्ट
तिसरी वनडे : 7 ऑगस्ट