![hardik natasha separated](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/05/hardik-natasa.jpg)
Hardik Natasha Separated: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने गुरूवारी (18 जुलै) आपली पत्नी नतासा स्टॅन्कोविक (Natasa Stankovic) तिच्यापासून आपण विभक्त होत असल्याचे जाहीर केले. इंस्टाग्राम पोस्ट करत त्याने ही माहिती सार्वजनिक केली.
Hardik Pandya and Natasha part ways. pic.twitter.com/gnTNI7Lduu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 18, 2024
हार्दिक हा सार्बियाची मॉडेल नतासा स्टॅन्कोविक हिच्यासोबत 2020 मध्ये नात्यात आला होता. त्यांनी जानेवारी 2020 मध्ये एंगेजमेंट केलेली. त्याच वर्षी जुलै महिन्यात त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा नव्याने लग्नाचा समारंभ आयोजित केलेला. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे वृत्त होते. नतासा आयपीएल दरम्यान देखील मुंबई इंडियन्स आणि हार्दिकला पाठिंबा देताना दिसली नव्हती. आयपीएल संपल्यानंतर दोघांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनी जास्त जोर धरलेला. मात्र, आता अखेर या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
हार्दिकने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले,
‘चार वर्षांच्या नात्यानंतर मी आणि नतासाने संगनमताने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांसोबत ही वर्ष आम्ही आनंदाने आणि एकमेकांचा सन्मान करत घालवली. यादरम्यान आमच्या आयुष्यात अगस्त्य आला. इथून पुढेही तो आमच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी असेल. दोघे मिळून आम्ही त्याची जबाबदारी घेऊ. तसेच त्याला जगातील सर्व आनंद देण्याचा प्रयत्न करू. आम्ही विनंती करतो की, या अवघड आणि संवेदनशील काळात तुम्ही आम्हाला पाठिंबा देत सहकार्य कराल.’
विशेष म्हणजे आजच हार्दिक याच्याकडून भारतीय संघाचे उपकर्णधारपदही काढून घेण्यात आले आहे.
(Hardik Natasha Separated Officially Hardik Declare On Instagram)
हे देखील वाचा- Hardik Pandya चे नशीब पुन्हा रूसले! कॅप्टन्सीच्या नादात उपकर्णधारपदही गेले, या 3 कारणांनी झाले डिमोशन