Breaking News

Paris Olympics 2024: दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारतीयांची बल्लेबल्ले, पाहा सगळे निकाल

Paris olympics 2024
Photo Courtesy: X

Paris Olympics 2024 Updates: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत असलेल्या ऑलिंपिक्स स्पर्धेत भारतीय संघासाठी दुसऱ्या दिवशीचे सकाळचे सत्र आनंददायी राहिले. भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या सर्व इव्हेंटमध्ये खेळाडूंना यश लाभले.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारताची प्रमुख बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिने सुरुवात केली. तिने मालदीवच्या फातिमा हिला 21-9, 21-6 असे सहज पराभूत केले. यासह तीने आपल्या तिसऱ्या मेडलच्या दिशेने आगेकूच सुरू केली. तिच्याबरोबरच नौकानयनपटू बलराज पंवर (Balraj Panwar) याने आपल्या रेपचेज राऊंडमध्ये द्वितीय स्थान पटकावण्यात यश मिळवले. यासोबतच तो उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला.

महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या एलावेनिल वलारिवन (Elavenil Valarivan) व रमिता जिंदाल (Ramita Jindal) यांनी आव्हान सादर केले होते. एकवेळ एलावेनिल पहिल्या स्थानी पोहोचली होती. ती अंतिम फेरीसाठी पात्र होईल असे वाटत असताना अखेरच्या वेळी तिच्याकडून चूक घडली. यामुळे ती दहाव्या स्थानी घसरली. दुसरीकडे रमिता हिने शानदार पुनरागमन करत पाचव्या स्थानी झेप घेतली. या प्रकारात अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.

अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेली रमिता उद्या आपला अंतिम फेरीचा राऊंड खेळेल. तिच्यापूर्वी मनू भाकेर हिने पहिल्या दिवशी 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे.

रविवारी भारताचे बॅडमिंटनपटू आपले आव्हान सादर करणार आहेत. यासोबतच टेनिसमध्ये रोहन बोपन्ना व श्रीराम बालाजी ही जोडी, तसेच पुरुष एकेरीत सुमित नागल कोर्टवर उतरेल.

(Paris Olympics 2024 Updates Ramita Jindal Into Finals)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)