
Jofra Archer Bowl Most Expensive Spell In IPL History: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स (SRHvRR) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात घरच्या मैदानावर खेळत असलेल्या सनरायझर्सने 6 बाद 286 अशी मोठी धावसंख्या उभी केली. ही आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. त्याचवेळी राजस्थानचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याच्या नावावर एक लाजिरवाना विक्रम जमा झाला.
Jofra Archer has bowled the most expensive spell in IPL history 😳#SRHvsRR #IPL2025 pic.twitter.com/jXoIYRjS79
— Wisden (@WisdenCricket) March 23, 2025
Jofra Archer Bowl Most Expensive Spell In IPL History
कर्णधार रियान पराग याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय गोलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. राजस्थानच्या सर्वच गोलंदाजांचा हैदराबादच्या फलंदाजांनी यथेच्छ समाचार घेतला. आयपीएल लिलावात 12.50 कोटींची बोली लागलेला आर्चर सर्वात महागडा ठरला. त्याच्या चार षटकात तब्बल 76 धावा कुटल्या गेल्या. यामध्ये केवळ एक चेंडू निर्धाव होता. तसेच त्याला एकही बळी मिळाला नाही. ही आयपीएलच्या 18 वर्षाच्या इतिहासातील सर्वात खराब कामगिरी ठरली.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
यापूर्वी आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकण्याचा विक्रम मोहित शर्मा याच्या नावे होता. मोहितने आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चार षटकात 73 धावा दिल्या होत्या. तर 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी खेळणाऱ्या बसिल थंपीने आरसीबीविरुद्ध 70 धावा दिलेल्या.
(Jofra Archer Bowl Most Expensive Spell In IPL History)
हे देखील वाचा- अखेर 43 व्या वर्षी MS Dhoni रिटायरमेंटवर बोललाच! म्हणाला, “ही फ्रॅंचायझी मला…”
कमबॅक असावा तर असा! Ishan Kishan ने ठोकली IPL 2025 मधील पहिली सेंच्युरी, SRH 286/6