Paris Olympics 2024 Updates: मंगळवारी (30 जुलै) भारतीय क्रीडा प्रेमींसाठी पॅरिस ऑलिंपिक 2024 (Paris Olympics 2024) मधून आनंदाची बातमी आली आहे. मिश्र 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सरबजोत सिंग (Sarabjot Singh) व मनू भाकेर (Manu Bhaker) यांनी कांस्य पदक पटकावले. भारताचे हे स्पर्धेतील दुसरे पदक असून, ही दोन्ही पदके मनू भाकेर (Manu Bhaker Bronze Medal) हिच्या नावावर नोंदवली गेली आहेत. भारताच्या 124 वर्षांच्या ऑलिंपिक इतिहासात एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली.
(Manu Bhaker And Sarabjot Singh Won Bronze Medal In Paris Olympics 2024)