Breaking News

Travis Head ने 25 चेंडूत आणली त्सुनामी! पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय

TRAVIS HEAD
Photo Courtesy: X

Travis Head Blazing Inning: स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलिया (SCO v AUS) यांच्या दरम्यानच्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून मोठा विजय मिळवला. विजयासाठी मिळालेल्या 155 धावांचा पाठलाग करताना, ट्रेविस हेड (Travis Head) याने केवळ 9.5 षटकात संघाला विजय मिळवून दिला.

एडिनबर्ग येथे झालेल्या या सामन्यात स्कॉटलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना, 154 धावा उभ्या केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात झाली. मात्र, ट्रेविस हेड याने आपला जबरदस्त फॉर्म कायम राखत केवळ 25 चेंडूंमध्ये 80 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्याने 12 चौकार व 5 षटकार खेचले. हे ऑस्ट्रेलियासाठी सर्वात वेगवान टी20 अर्धशतक ठरले. बाद झाल्यानंतर कर्णधार मिचेल मार्श याने 12 चेंडूत 39 धावा केल्या. उभय संघातील दुसरा सामना शुक्रवारी (6 सप्टेंबर) खेळला जाईल.

(Australia Beat Scotland In First T20I Travis Head Hits 80)