IND v BAN Chennai Test Day 2: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या पहिल्या चेन्नई कसोटी (Chennai Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही भारतीय संघाने पाहुण्या संघाला डोके वर काढू दिले नाही. गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत बांगलादेशचा पहिला डाव केवळ 149 धावांवर संपवला. पहिल्या डावात मिळालेल्या 227 धावांच्या आघाडीनंतर, दुसऱ्या डावात 3 बाद 81 अशी चांगली मजल मारत भारताने आपली आघाडी 308 पर्यंत पोहोचवली. तिसऱ्याच दिवशी सामना जिंकण्याची संधी आता भारतीय संघाकडे असेल.
1ST Test. WICKET! 91.2: Jasprit Bumrah 7(9) ct Zakir Hasan b Hasan Mahmud, India 376 all out https://t.co/fvVPdgY1bR #INDvBAN @IDFCFIRSTBank #1stTEST
— BCCI (@BCCI) September 20, 2024
IND v BAN Chennai Test Day 2 Updates
पहिल्या दिवशी नाबाद असलेल्या अश्विन व जडेजा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, जडेजा पहिल्या दिवशीच्याच 84 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या आकाश दीप याने 17 धावांचे योगदान दिले. तर, अश्विनची खेळी 113 धावांवर समाप्त झाली. या तिघांना देखील तस्कीन अहमद (Taskin Ahmed )याने बाद केले. तर, अखेरचा फलंदाज जसप्रीत बुमराह याला बाद करत हसन महमूद (Hasan Mahmud) याने आपले पाच बळी पूर्ण केले.
आपल्या पहिल्या डावात भारतीय संघाला प्रतिउत्तर देण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पहिल्याच षटकात शदमान इस्लाम याचा त्रिफळा उडवला. पहिल्या सत्राचा खेळ संपण्यासाठी आठ मिनिटे शिल्लक असताना आकाश दीप (Akash Deep} हा आपले पहिले षटक टाकण्यासाठी आला. त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर झाकीर हसन आणि दुसऱ्या चेंडूवर मोमिनूल हक याची दांडी वाकवत बांगलादेशची अवस्था 3 बाद 22 अशी केली. उर्वरित चार चेंडू खळून काढत रहीम याने बांगलादेशचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.
Boom Boom Bumrah 🎇
Cleans up Shadman Islam with a peach of a delivery.
Live – https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/RYi9AX30eA
— BCCI (@BCCI) September 20, 2024
दिवसातील पहिले सत्र गाजवल्यानंतर दुसऱ्या सत्राची सुरुवात भारतीय संघाने शानदार केली. मोहम्मद सिराजने कर्णधार शांतो याला 20 तर बुमराहने रहीमला 8 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर अनुभवी शाकिब अल हसन (32) व लिटन दास (22) यांच्यात भागीदारी झाली. दोघांची अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर, जडेजांनी लागोपाठच्या षटकात त्यांना बाद केले. चहापानापूर्वीच्या अखेरच्या षटकात बुमराहने महमूद याला बाद करत भारताला आठवे यश मिळवून दिले. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस बांगलादेशने 8 बाद 112 धावा केल्या असून, त्यांच्यावर फॉलोऑनची नामुष्की आहे.
That'll be Tea on Day 2 of the 1st Test.
Bangladesh 112/8, trail #TeamIndia by 264 runs.
Scorecard – https://t.co/jV4wK7BgV2……… #INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/D23dS3I3Y4
— BCCI (@BCCI) September 20, 2024
तिसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यानंतर बुमराह याने अप्रतिम यॉर्कर मारत अहमद याला बाद केले. हा बुमराह याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील 400 वा बळी ठरला. अखेरचा फलंदाज शिल्लक असल्याने मेहदी हसन मिराज याने काही मोठे फटके खेळले. मात्र, सिराज याने अहमद याला बाद करत त्यांचा डाव 149 धावांवर संपवला. मिराज याने नापास 27 धावा केल्या. भारतासाठी बुमराह याने सर्वाधिक चार बळी टिपले. यासह भारताने 227 धावांची मोठी आघाडी मिळवली. तसेच बांगलादेशला फॉलोऑन न देता दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Innings Break!
Four wickets for Bumrah and two apiece for Siraj, Akash Deep and Jadeja as Bangladesh are all out for 149 runs.
Trail by 227 runs.
Scorecard – https://t.co/jV4wK7BgV2… #INDvBAN@IDFCFIRSTBank pic.twitter.com/hT7IKyTlqW
— BCCI (@BCCI) September 20, 2024
दुसऱ्या डावाच्या आधीच 227 धावांची मोठी आघाडी घेऊन भारतीय संघ मैदानात उतरला. मात्र, आक्रमक सुरुवात केल्यानंतरही भारताला पहिला धक्का लवकर बसला. कर्णधार रोहित शर्मा याचे अपयश पुन्हा दिसले. केवळ पाच धावा काढून तो बाद झाला. दुसरा सलामी वीर यशस्वी जयस्वाल हा देखील फक्त दहा धावा करू शकला. त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी शुबमन गिल व विराट कोहली यांनी चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची 39 धावांची भागीदारी मिराज याने विराटला पाहिजेत करत संपवली. विराटने सतरा धावा केल्या.
दिवसातील उर्वरित षटके खेळून काढण्यासाठी गिल व रिषभ पंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पंतने एक चौकार व एक षटकार खेचत, दिवस संपवला. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने 3 बाद 81 धावा केल्या असून, गिल 33 तर पंत 12 धावांवर नाबाद आहे. अफगाणिस्तानसाठी राणा, तस्किन व मिराज यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. भारतीय संघाची आघाडी आता 308 धावांची झाली असून, तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रानंतर भारत आपला डाव घोषित करू शकतो.
Stumps on Day 2 in Chennai!#TeamIndia move to 81/3 in the 2nd innings, lead by 308 runs 👌👌
See you tomorrow for Day 3 action 👋
Scorecard – https://t.co/jV4wK7BOKA#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/EmHtqyg9W3
— BCCI (@BCCI) September 20, 2024
हा सामना जिंकून भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपले स्थान पहिल्या दोनमध्ये पक्के करण्याची चांगली संधी असेल. तर, दुसऱ्या बाजूला ही कसोटी वाचवण्याचे मोठे आव्हान बांगलादेश संघासमोर असणार आहे. नुकतेच पाकिस्तान दौऱ्यावर मालिका विजय साजरा केलेल्या बांगलादेश संघाला दुसरा सामना कानपूर येथे खेळायचा आहे.
(IND v BAN Chennai Test Day 2 Updates)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।