Breaking News

Sarfaraz Khan 200: रनमशिन सर्फराजची नव्या हंगामात तुफानी सुरुवात! इराणी ट्रॉफीमध्ये ठोकले द्विशतक

sarfaraz khan 200
Photo Courtesy:X

देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाचे स्पर्धा असलेल्या इराणी ट्रॉफी (Irani Trophy 2024) स्पर्धेचा रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध मुंबई (Rest Of India v Mumbai) असा सामना लखनऊ येथे खेळला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईचा अनुभवी फलंदाज सर्फराज खान (Sarfaraz Khan) याने अप्रतिम फलंदाजीचे प्रात्यक्षिक घडवले. त्याने कालच्या आपल्या नाबाद अर्धशतकी खेळीला दुसऱ्या दिवशी द्विशतकापर्यंत नेले (Sarfaraz Khan 200).

पहिल्या दिवशी अर्धशतक करून नाबाद राहिलेल्या सर्फराज याने दुसऱ्या दिवशी देखील अजिंक्य रहाणे सोबत संघाचा डाव पुढे नेला. राहणे 97 धावांवर बाद झाला. मुलाणी फारसे योगदान देऊ शकला नाही. मात्र, अष्टपैलू तनुष कोटियान याच्या सोबतीने सर्फराजने डाव सावरला. दोघांनी सातव्या गड्यासाठी दीडशतकी भागीदारी केली. यादरम्यान सर्फराजने आपले पंधरावे प्रथमश्रेणी शतक पूर्ण केले.

आपली खेळी अशीच पुढे नेत त्याने चौथ्यांदा 200 पेक्षा जास्त धावा करण्याचा कारनामा केला. तसेच रणजी ट्रॉफी इतिहासात मुंबईसाठी द्विशतक करणारा तो पहिलाच फलंदाज बनला. त्याच्या खेळीमुळे मुंबई संघाने 500 पेक्षा जास्त धावांची मजल मारली. अखेरच्या सत्रातील काही षटके मुंबई रेस्ट ऑफ इंडियाला फलंदाजासाठी देऊ शकते.

(Sarfaraz Khan 200 In Irani Trophy 2024)