
PKL 11 Final: प्रो कबड्डी 2024 चा अंतिम सामना रविवारी (29 डिसेंबर) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे खेळला जाईल. पीकेएल 11 (PKL 11) च्या या अंतिम सामन्यात हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स (Patna Pirates) आमने-सामने येणार आहेत. पटना आपल्या चौथ्या तर हरयाणा पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहे.
PKL 11 Final Preview
The 𝔾ℝ𝔸ℕ𝔻 𝔽𝕀ℕ𝔸𝕃𝔼 of #PKL11 is here 🏆
Will the Steelers claim their first title, or will the Pirates become 4-time champs? 💙💚
💻 https://t.co/cfORnVakqn
📱 Pro Kabaddi Official App#ProKabaddi #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PKLFinal #HaryanaSteelers #PatnaPirates pic.twitter.com/4IPcncGAzO— ProKabaddi (@ProKabaddi) December 29, 2024
संपूर्ण हंगामात वर्चस्व गाजवत हरयाणा स्टिलर्स संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. अनुभवी प्रशिक्षक मनप्रीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ते सलग दुसऱ्यांदा स्पर्धेचा अंतिम सामना खेळतील. मागील हंगामात अंतिम सामन्यात त्यांना पुणेरी पलटनने पराभूत केले होते. त्यामुळे यावेळी ते विजेतेपदाचा चंग बांधलेले दिसतायेत.
हरयाणा संघाची ताकद त्यांचा मजबूत बचाव आहे. मागील तीन हंगामात वेगवेगळ्या संघांकडून अंतिम फेरीत पोहोचलेल्या इराणच्या मोहमदरेझा शादलू याने यावेळी देखील त्याच दर्जाचा खेळ दाखवला. त्याला राहुल सेथपाल व जयदीप तशीच साथ देताना दिसत आहेत. तर, आक्रमणाची जबाबदारी शिवम पठारे व विनय यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
दुसरीकडे पटना पायरेट्स नरेंदर रेढू यांच्या मार्गदर्शनात पाच हंगामाचा दुष्काळ संपवण्याची तयारी करत आहे. पटना संघाने तिसरा, चौथा व पाचवा हंगाम जिंकत हॅट्रिक साधली होती. त्यानंतर त्यांनी आठव्या हंगामात पुन्हा एकदा अंतिम फेरीत प्रवेश केलेला. मात्र, त्यांना पराभूत व्हावे लागलेले.
या हंगामात पूर्णपणे नव्या रूपात आलेल्या पटना संघाने सुरुवातीला काहीशी अडखळत सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सूर सापडल्यावर त्यांनी थेट अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. उपांत्य फेरीत त्यांनी दबंग दिल्ली संघाची 15 सामने अजिंक्य राहण्याची मालिका तोडली. पटना संघासाठी युवा देवांक लाल (Devank Lal) यानेच सर्वाधिक 296 रेडींग पॉईंट मिळवले आहेत. या सामन्यात 300 पॉईंटचा टप्पा पार करण्याची त्याच्याकडे संधी असेल. त्याला अयान याने तितकीच उत्कृष्ट साथ दिली आहे. तर, डिफेन्समध्ये शुभम शिंदे, दीपक राठी व अंकित जगलान हे योगदान देताना दिसत आहेत.
भारतीय वेळेनुसार सायंकाळी आठ वाजता हा सामना खेळला जाईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स व हॉटस्टारवरून केले जाईल.
(PKL 11 Final Preview Haryana Steelers Patna Pirates)
हरयाणा आणि पटना PKL 11 च्या फायनलमध्ये, दिल्ली-युपीचा स्वप्नभंग