Breaking News

इंडिया ए Emerging Asia Cup मधून बाहेर! अफगाणिस्तान ए चा ऐतिहासिक विजयासह फायनलमध्ये प्रवेश

EMERGING ASIA CUP
Photo Courtesy: X

India A Exit From Emerging Asia Cup 2024: ओमान येथे सुरू असलेल्या एमर्जिंग एशिया कप (Emerging Asia Cup) स्पर्धेतून भारत अ (India A) संघ बाहेर पडला आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तान अ संघाने भारत अ संघाला 20 धावांनी पराभूत केले. अष्टपैलू रमनदीप सिंग (Ramandeep Singh) याने अखेरच्या षटकापर्यंत दिलेली झुंज अपयशी ठरली.

India A Out Of Emerging Asia Cup 2024

साखळी फेरीत सलग तीन विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या भारतीय संघासाठी हा सामना अवघड ठरला. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजीची मिळालेले संधी साधली. सलामीवीर झुबेद अकबारी (64 धावा) व सेदीक अटल (83 धावा) यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. या जोडीने पहिल्या गड्यासाठीच 137 धावांची मोठी भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या करीम झनत याने अवघ्या 20 चेंडूंमध्ये 41 धावा कुटल्या. त्यामुळे अफगाणिस्तान संघाने 206 धावांचा मोठा डोंगर उभा केला. भारतासाठी रसिख सलाम याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

Emerging Asia Cup मध्ये इंडिया ए चा दुसरा विजय, अभिषेकची तुफानी फटकेबाजी

विजयासाठी मिळालेल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज अपयशी ठरले. नेहल वढेरा याने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो धावबाद झाला. संघ 10 षटकात 4 बाद 80 अशा स्थितीत असताना आयुष बदोनी व रमनदीप यांनी डाव हातात घेतला. बदोनीने 31 धावांचे योगदान दिले. रमनदीप याने तुफानी फटकेबाजी करत 25 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्याला निशांत सिंधू याने 23 धावा करून साथ दिली. अखेरच्या षटकात रमनदीप मोठ्या फटके खेळू नसल्याने संघाला पराभव स्वीकारावा लागला. अखेरचा चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 34 चेंडूंमध्ये 64 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, पहिल्या उपांत्य सामना श्रीलंका अ संघाने पाकिस्तान अ मला पराभूत करत अंतिम फेरीत जागा निश्चित केली होती. उभय संघांमध्ये रविवारी अंतिम सामना खेळला जाईल.

(India A Lost In Emerging Asia Cup 2024 Semi Final Against Afghanistan A)

हे देखील वाचा: BGT 2024-2025: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा, अखेर ‘त्या’ खेळाडूला संधी मिळालीच, पाहा संपूर्ण स्कॉड