![ICC AWARDS 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/12/ICC-AWARDS-2024.jpg)
ICC Awards 2024: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी सरत्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची नामांकने (ICC Awards 2204 Nomination) जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पुरुष गटात टी20 खेळाडूसाठी दिल्या जाणाऱ्या आयसीसी पुरुष टी20 क्रिकेटपटू 2024 (ICC Mens T20I Cricketer Of The Year 2024) या पुरस्कारासाठी केवळ एका भारतीयाला नामांकन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जातेय.
ICC Awards 2024 Nomination
🇿🇼🇦🇺🇵🇰🇮🇳
A star-studded shortlist for ICC Men’s T20I Cricketer of the Year has been revealed 👀#ICCAwardshttps://t.co/mhvz13ik6i
— ICC (@ICC) December 29, 2024
आयसीसीने सर्वोत्तम पुरुष टी20 क्रिकेटपटू 2024 साठी चार खेळाडूंना नामांकित केले आहे. यामध्ये पाकिस्तानचा बाबर आझम (Babar Azam), ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड (Travis Head), झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) व भारताचा अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांचा समावेश आहे. मात्र, या नामांकनावरून आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या नामांकनांमध्ये भारताला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांचा समावेश नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. नामांकित झालेल्या खेळाडूंपैकी ट्रेविस हेड याने 539 धावा या वर्षभरात काढल्या. तर, सिकंदर रझा याने 24 बळी व 573 धावा अशी जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करून दाखवली. तर, गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अर्शदीपने 36 बळी आपल्या नावे केले.
या यादीत सामील असलेल्या बाबर आझम याने वर्षभरात आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 738 धावा केल्या. मात्र, संघाच्या विजयातील त्याचे योगदान तितकेसे राहिले नाही. विशेष म्हणजे त्याच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ टी20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 6 फेरीसाठी देखील पात्र ठरू शकला नव्हता. त्याची सरासरी देखील 33 इतकीच राहिली. तर, स्ट्राईक रेट 133 इतकाच होता.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
दुसऱ्या बाजूला भारताचा प्रमुख अष्टपैलू असलेल्या हार्दिक पंड्या याने वर्षभरात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. त्याने 44 च्या सरासरीने व 152 पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने 352 धावा केल्या. तसेच त्याच्या नावे 16 बळी देखील जमा आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या नामांकनात संधी मिळायला हवी होती अशी चर्चा होतेय.
भारताचा विश्वविजयी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने यावर्षी 11 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 378 धावा केल्या. तर, टी20 विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकणाऱ्या जसप्रीत बुमराह याने केवळ आठ सामन्यात 15 बळी मिळवले होते. याबरोबरच वर्षातील सर्वोत्तम पुरुष वनडे खेळाडूच्या नामांकनासाठी कोणत्याही भारतीय खेळाडूचा विचार झालेला नाही.
(ICC Awards 2024 Nomination No Hardik There)
हे देखील वाचा- SAvPAK: दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! थरारक सामन्यात पाकिस्तानला नमवत गाठली WTC ची फायनल