Breaking News

हरयाणा स्टिलर्स PKL 11 ची चॅम्पियन! मराठमोळा शिवम पठारे ठरला फायनलचा ‘मॅचविनर’

pkl 11 winner
Photo Courtesy: X/Pro Kabaddi

PKL 11 Champions Haryana Steelers: प्रो कबड्डी 2024 (Pro Kabaddi 2024) च्या अंतिम सामन्यात हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स समोरासमोर आले होते. स्पर्धेत आतापर्यंत वर्चस्व गाजवलेल्या हरयाणा संघाने अंतिम फेरीतही तोच धडाका दाखवत, पहिल्यांदाच या प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

साखळी फेरीत अव्वल स्थानी राहिलेल्या हरियाणा संघाने या अंतिम सामन्यातही जोरदार सुरुवात केली. शिवम पठारे (Shivam Pathare) याने रेड व शादलू याने डिफेन्समध्ये गुण मिळवत संघाला आघाडीवर नेले. सुरुवातीच्या दहा मिनिटानंतर सामना बरोबरीत आला होता. पटना पायरेट्स संघाने देखील हरयाणा संघाला फार मोठी आघाडी मिळू दिली नाही.

दुसऱ्या हाफमध्ये हरयाणा संघाने आपल्या आक्रमणाची धार आणखी वाढवली. शिवम याला विनय याने साथ दिली. अखेरच्या चार मिनिटात हरयाणा संघाने आघाडी घेत विजय निश्चित केला. हरयाणा साठी शिवम याने पाच रेड व चार डिफेन्स पॉईंट कमावले. तर, विनयने सहा रेड पॉइंट व शादलूने पाच गुण आपल्या नावे केले.

(Haryana Steelers Won PKL 11 Title)