Breaking News

कॅप्टन कूल MS Dhoni झाला 44 वर्षांचा! वाचा त्याच्या बाबतच्या 44 रंजक गोष्टी

ms dhoni
Photo Courtesy: X

MS Dhoni 44 th Birthday: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सोमवारी (7 जुलै) 44 वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला धोनीचा वाढदिवस त्याचे चाहते मोठ्या प्रमाणावर साजरा करत असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही धोनीची क्रेझ तशीच असल्याचे दिसून येते. त्याच्या या 44 व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्याबाबतच्या 44 रंजक गोष्टी सांगणार आहोत.

44 Facts About MS Dhoni On His 44 Th Birthday

1) पूर्वीचे बिहार आणि सध्याच्या झारखंडमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात 7 जून 1981 रोजी जन्म

2) त्याचे वडील पानसिंग पंप ऑपरेटर व आई गृहिणी होती. धोनीला एक भाऊ आणि एक बहीण आहे

3) धोनीने आपले प्राथमिक शिक्षक डीएव्ही जवाहर विद्या मंदिर रांची येथे पूर्ण केले

4) धोनी लहानपणापासून फुटबॉलचा शौकीन होता, तो आपल्या शाळेसाठी गोलकीपर म्हणून भूमिका निभावत

5) शाळेच्या क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक न आल्याने क्रीडाशिक्षक केशव रंजन बॅनर्जी यांनी धोनीला क्रिकेट खेळण्यासाठी तयार केले

6) धोनी याच्या कुटुंबाचे खरे आडनाव धौनी आहे. मात्र, त्याच्या शाळेच्या कागदपत्रांवर ते धोनी असे लिहिले गेले होते. जे कायमस्वरूपी राहिले.

7) वयोगट क्रिकेट खेळत असताना आक्रमक फलंदाजीमुळे धोनी लवकरच मोठ्या स्पर्धांमध्ये दिसू लागलेला

8) सन 1995 ते 1998 दरम्यान तो सेंट्रल कोल फिल्डस लिमिटेड संघासाठी खेळला, त्याच्या कामगिरीमध्ये सीसीएल प्रथमच मोठ्या स्तरावर खेळण्यासाठी पात्र झाली होती

9) 1997-1998 च्या विनू मंकड अंडर 16 संघासाठी त्याची प्रथमच निवड झाली

10) कामगिरीतील सातत्यामुळे पुढील दोन वर्षात तो बिहार अंडर 19, ईस्ट झोन अंडर 19 व बिहार रणजी अशा स्तरांवर खेळला

11) याच दरम्यान त्याला रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर ही नोकरी देखील मिळाली

12) क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने काही महिन्यातच ही नोकरी सोडली

13) 1999 ते 2004 यादरम्यान खेळलेल्या प्रत्येक देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत धोनीने चमकदार कामगिरी करत लक्ष वेधून घेतले

14) 2000 अंडर 19 क्रिकेट विश्वचषकासाठी त्याची भारतीय संघात निवड होऊ शकली नव्हती

15) त्याच दरम्यान धोनीने आपली क्रिकेट कौशल्य नीट करण्यासाठी बिहार व झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात टेनिस क्रिकेट खेळले, या दरम्यान त्याने आपला मित्र संतोष यादव याच्याकडून हेलिकॉप्टर शॉट देखील शिकला. 2004 मध्ये बीसीसीआयच्या टॅलेंट विंगची नजर त्याच्यावर पडली आणि त्याला भारत अ संघात स्थान देण्यात आले

16) झिम्बाब्वे दौऱ्यात झालेल्या भारत अ, पाकिस्तान अ व झिम्बाब्वे अ या तिरंगी मालिकेत 6 सामने खेळताना त्याने 72.40 च्या सरासरीने 362 धावा केल्या होत्या. मालिकेनंतर धोनीची बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली

17) बांगलादेशविरुद्धच्या आपल्या पदार्पणाच्या पहिल्या वनडे सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर धावबाद झाला

18) पहिल्या चार सामन्यात सातत्याने अपयशी झाल्यानंतर भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने त्याला पाचव्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली

19) विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात त्याने 123 चेंडूमध्ये 148 धावांची खेळी केली

20) त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 183 धावांची ऐतिहासिक खेळी करत त्याने क्रिकेटविश्वात आपले नाणे खणखणीत वाजवले

21) धोनीने डिसेंबर 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले

(MS Dhoni Celebrating 44 Th Birthday)

22) पुढील वर्षीच्या पाकिस्तान दौऱ्यावर त्याने वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याकडून कौतुक वसूल केले

23) 2006 मध्ये भारताने खेळलेल्या पहिल्या टी20 सामन्यात देखील तो संघाचा भाग होता

24) 2006 मध्ये त्याला एमटीव्ही युथ आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला

25) 2007 वनडे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर अनेक अनुभवी क्रिकेटपटूंनी 2007 टी20 विश्वचषक खेळण्यास नकार दिल्याने धोनीकडे टी20 संघाचे नेतृत्व आले

26) कर्णधार म्हणून आपली पहिलीच स्पर्धा खेळताना त्याने भारतीय संघाला 2007 टी20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकून दिले

27) यानंतर भारताच्या तिन्ही संघाचे नेतृत्व त्याच्याकडे देण्यात आले

28) पहिल्यांदा झालेल्या आयपीएल 2008 लिलावात धोनी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता

29) त्याच्याच नेतृत्वात भारताने 2008 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका जिंकली

30) भारतीय संघाने यानंतर वनडे व कसोटी क्रमवारीत देखील अव्वल स्थानिक पोहोचण्याचा कारनामा केला

31) त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2009-10 मध्ये प्रथमच न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकली

32) कर्णधार म्हणून धोनीने चेन्नई सुपर किंग्सला 2010 व 2011 अशी सलग दोन वर्ष आयपीएल विजेता बनवले. 2010 मध्ये भारताने 15 वर्षानंतर आशिया चषक जिंकण्याची कामगिरी त्याच्याच नेतृत्वात केली

33) 2011 मध्ये भारतीय उपखंडात झालेल्या वनडे विश्वचषकात भारताने धोनीच्या नेतृत्वात विश्वविजेते होण्याचा मान मिळवला, भारताने तब्बल 28 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर विश्वचषक जिंकला होता

34) 2013 मध्ये धोनी कर्णधार असताना भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केली, आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी जिंकणारा धोनी पहिला कर्णधार बनला

35) 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्तीची घोषणा केली, 90 सामन्यात त्याने 4876 धावा केल्या (Latest Cricket News)

36) त्यानंतर 2016 च्या अखेरीस त्याने वनडे व टी20 संघाच्या कर्णधारपदाचा देखील राजीनामा दिला, वनडे कर्णधार म्हणून त्याच्या विजयाची टक्केवारी 56 तर टी20 कर्णधार म्हणून ही टक्केवारी 59 इतकी दिसून येते

37) धोनी याला कारकीर्द पाच आयसीसी पुरस्कार मिळाले. तर, तो 10 महिने वनडे फलंदाजी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी होता

38) 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्स पुनरागमन करत असताना त्याने पुन्हा एकदा संघाला विजेते बनवले

39) 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, त्याने भारतासाठी 350 वनडे सामने खेळताना 10,773 धावा केल्या. तसेच तो भारतासाठी 98 वनडे सामने देखील खेळला

40) निवृत्तीनंतर देखील 2021 व 2023 मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल विजेता बनवले, चेन्नईला पाच वेळा आयपीएल विजेता आणि दोन वेळा चॅम्पियन्स लीग विजेतेपद मिळवून देण्यात पूर्ण झाला म्हणून त्याने भूमिका बजावली

41) धोनीला भारत सरकारकडून खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री व पद्मभूषण असे पुरस्कार मिळाले आहे, तसेच तो टेरिटोरिएल मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून देखील रूजू आहे

42) धोनीने 2010 मध्ये आपली मैत्रीण साक्षी हिच्या सोबत लग्न गाठ बांधली होती, त्यांना झिवा नावाची मुलगी देखील आहे

43) 2025 नुसार धोनीची मालमत्ता 1053 कोटींची आहे, क्रिकेट व्यतिरिक्त त्याने रियल इस्टेट, स्पोर्ट्स टीम, फिल्म इंडस्ट्री आणि इतर अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे

44) नुकतेच त्याने कॅप्टन कूल या नावासाठी भारत सरकारकडे रजिस्ट्रेशन केले असून, त्याला हे नाव दिले जाईल. त्यामुळे इतर कोणीही या नावाचा वापर करू शकणार नाही.

(MS Dhoni Birthday)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: आता Captain Cool MS Dhoni शिवाय कोणीच नाही, भारत सरकारनेच केल शिक्कामोर्तब