Breaking News

Champions Trophy 2025 च्या संघ निवडीवर मोठी अपडेट, अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट?

champions trophy 2025
Photo Courtesy: X

Champions Trophy 2025 Team India Selection: पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारताने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. भारतीय संघात (Team India For Champions Trophy) या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी मोठे बदल होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जातेय. त्याबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर येतेय.

Updates On Champions Trophy 2025

आयसीसी स्पर्धांच्या पाच आठवडे आधी संघ घोषित करावा लागतो. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संघ घोषित करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी आहे. परंतु, बीसीसीआयने आयसीसीकडे अधिकचा वेळ मागितल्याचे सांगण्यात येते. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर निवड समिती काही वेळ घेऊ इच्छिते, त्यामुळे ही विनंती केल्याचे कळते. निवड समिती व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे दीर्घ चर्चेनंतर आपला संघ घोषित करू शकतात.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही अनेक वरिष्ठ खेळाडूंसाठी अखेरच्या आयसीसी स्पर्धा ठरू शकते. अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा याचा संघात समावेश होतो का? यावर अनेकांचे लक्ष असेल. संघ व्यवस्थापन जडेजाच्या पुढे पाहण्यास उत्सुक असल्याचे समजते. तसेच, विराट कोहली व कर्णधार रोहित शर्मा यांची ही स्पर्धा समाधानकारक न राहिल्यास त्यांच्याबाबतही संघ व्यवस्थापन निर्णय घेण्याची शक्यता आहे. दोघांची कसोटी संघातील कामगिरी अत्यंत खराब राहिली असून, वनडे क्रिकेटमध्ये ते कशी कामगिरी करतात यावर त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे भवितव्य अवलंबून असेल. दोघांनी यापूर्वीच टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

या सर्वांमध्ये केएल राहुल व अक्षर पटेल यांचा वनडे संघात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. या व्यतिरिक्त सलामीवीर यशस्वी जयस्वाल, फिरकीपटू वरूण चक्रवर्ती व डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना वनडे संघाचा भाग बनवला जाऊ शकतो. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.

(Team India Updates For Champions Trophy 2025)

हे देखील वाचा- बहुप्रतिक्षित Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर, पाहा टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार?